निरोगी आहार आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण जर आपण असे अन्न खाल्ले नाही तर आपल्याला गंभीर आजारी देखील होऊ शकतात. म्हणूनच चांगला आहार हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवणं महत्त्वाचं आहे. मात्र, सामान्यतः असं दिसून येतं की लोक त्यांच्या खाण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि ते घरचे अन्न सोडून बाहेरचे अन्न खाणे पसंत करतात. अशा परिस्थितीत ते अनेक वेळा आजारांना बळी पडतात. इतकंच नाही तर याशिवाय आणखी एक गोष्ट खूप पाहायला मिळते की लोक रात्री काहीही खातात आणि ते हे विसरतात की असे केल्याने त्यांची तब्येत बिघडू शकते. म्हणूनच रात्रीच्या वेळी कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…
सोडा शरीराला हानी पोहोचवू शकतो
रात्रीच्या जेवणानंतर अन्न पचवण्यासाठी लोक सोडा पितात, असं सामान्यतः पाहिलं जातं. पण सोडा किंवा सोडा पावडर रात्री वापरल्यास पोट खराब होऊ शकतं. त्यामुळे सोडा पिणे टाळणं हाच उत्तम पर्याय आहे.
कॉफी शरीरासाठी योग्य नाही
रात्री कॉफी पिणे फायदेशीर नाही. कारण यामुळे तुम्हाला झोप उडू शकते. त्याच वेळी, जर तुम्हाला जर दररोज कॉफी पिण्याची सवय असेल तर तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही आणि तुम्ही आजारी पडू शकता. कॉफीमधील कॅफिनमुळे शरीराला ताजेपणा मिळतो.
पिझ्झा खाणे टाळा
कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड आपल्या शरीरासाठी चांगले नसले तरी रात्रीच्या वेळी पिझ्झा खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. त्यात चीजचे प्रमाण जास्त असल्याने ते तुमचे पोटही खराब करू शकते.
आणखी वाचा : Health Tips: पचनसंस्था सुरळीत ठेवायची असेल तर या तीन गोष्टींचे सेवन अवश्य करा
संत्र्याचा रस
झोपण्यापूर्वी संत्र्याचा रस घेणे चांगले मानले जात नाही. रात्री झोपताना ते पचत नाही आणि शरीरात अॅसिड तयार होते. अशा स्थितीत रात्री ज्यूस पिण्याऐवजी थेट फळे खाऊ शकता.
अनुभवी आहारतज्ज्ञ प्रिया पांडे यांनी हे वरील मार्गदर्शन केलंय. त्यांनी कानपूरच्या सीएसजेएममध्ये काम केलंय. विद्यापीठातून मानवी पोषण विषयात B.Sc केलं आहे. त्यांनी कानपूर येथील आभा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहारतज्ज्ञ म्हणून काम केलं आहे. त्यांनी जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये पोषण व्याख्यान विषयाचे प्रतिनिधी म्हणूनही सहभाग घेतला आहे. त्यांना या क्षेत्रातील 8 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.