Aloevera For Belly Fat : वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात कोरफडीचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरेल. यामध्ये असलेले पोषक तत्व वजन कमी करण्यास मदत करतात आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया सुलभ करतात. कोरफड पचनास मदत करते. कमकुवत चयापचय हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. जेव्हा चयापचय योग्य होतं, तेव्हा वजन कमी होऊ लागतं. कोरफडीमुळे चयापचय सुधारतं. यामुळे शरीरात साठलेले फॅट्स बर्न होतात आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात. जाणून घ्या कोणत्या प्रकारे तुम्ही कोरफडीचे सेवन करू शकता-
जेवण करण्यापूर्वी कोरफडीचा रस घ्या
वजन कमी करण्यासाठी, प्रत्येक जेवणाच्या १५ मिनिटे आधी एक चमचा कोरफडीचा रस प्या. दोन आठवडे असे केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.
व्हेजीटेबल ज्यूससह कोरफड
वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या रसामध्ये व्हेजीटेबल ज्यूस देखील मिसळू शकता. हे तुमचे वजन कमी करण्याची प्रक्रिया सुलभ करते. वजन कमी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
आणखी वाचा : वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांना स्ट्रोकचा धोका वाढला, जाणून घ्या साधे-सोपे उपाय
गरम पाण्यासोबत सेवन
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा कोरफडीचा रस मिसळा आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. यामुळे कोरफडीची चवही बदलेल.
मधासोबत सेवन
नैसर्गिक चव वाढवण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या रसामध्ये मधाचे काही थेंब देखील घालू शकता. कोरफड तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते.
आणखी वाचा : Travel Tips: तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पहिल्यांदाच प्रवास करताय? मग चुकूनही या चार चुका करू नका
लिंबूसोबत सेवन
कोरफडीची चव वाढवण्यासाठी तुम्ही ताज्या लिंबाच्या रसाचे काही थेंब देखील घालू शकता. यामुळे तुमचे वजनही वेगाने कमी होईल.