ख्रिसमस सण आता अगदी काही दिवसांवर आलेला आहे. तुम्हालाही घर किंवा ऑफिसमध्ये ख्रिसमस ट्रीची सजावट करायची असेल आणि त्यासाठी अगदी कमी पैशांत काही शोधात असाल, तर या पाच भन्नाट कल्पना नक्कीच तुमची मदत करतील. ख्रिसमससाठी आणलेल्या खोट्या झाडाचे सण संपल्यानंतर काय करायचे असा प्रश्न पडतो. अनेकदा ते आपल्या माळ्यावरची जागा किंवा घरातील एखादा कोपरा अडवून ठेवतात. अशा वेळेस नको असलेल्या वस्तू, जुनी किंवा वापरात नसणारी वह्या-पुस्तकं किंवा साध्या दिव्यांच्या माळांनी तुम्ही ख्रिसमस ट्री बनवू आणि सजवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्यातील दडलेल्या कलाकाराला जागे करा आणि या सोप्या DIY हॅक्सने ऑफिस पार्टी किंवा घरात हे अतिशय सुंदर आणि स्वस्तात तयार होणारे ख्रिसमस ट्री कसे बनवायचे ते पाहा.

DIY ख्रिसमस ट्री बनवण्याच्या पाच सोप्या पद्धती

१. झाडांच्या फांद्यांचा उपयोग करा.

भरपूर झाडं असतील अशा बागेत जा. तिथे तुम्हाला झाडाच्या तुटलेल्या फांद्या मिळतील. आता लहान ते मोठ्या आकाराच्या फांद्या निवडून घरी घेऊन या. त्यांना कपड्याच्या मदतीने स्वच्छ करा आणि हवे असल्यास एखादा रंग लावा. आता, तंगूस किंवा नायलॉनचे दोरे या फांद्यांना बांधून घ्या आणि भिंतीवर ख्रिसमसचे झाड जसे दिसते तसे खाली सर्वात मोठी फांदी आणि वर सर्वात लहान फांदी अशा पद्धतीने लावा. नंतर त्याला हव्या त्या वस्तूंनी किंवा दिव्यांनी सजवा. सोशल मिडियावरील @genevavanderzeil या इन्स्टाग्राम अकाऊंटने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा : स्वयंपाकघरात एकही झुरळ दिसणार नाही; घरातील उदबत्त्या अन् कापूर करतील तुमची मदत! पाहा ही सोपी हॅक….

२. पुस्तकांचे झाड

तुम्हाला जर वाचनाची आवड असेल आणि तुमच्याकडे भरपूर पुस्तके असतील तर ही ट्रिक खास तुमच्यासाठी. या पुस्तकांच्या झाडासाठी खोड म्हणून एखाद्या जाड पुस्तकाचा वापर करा. हे पुस्तक उभे ठेऊन त्यावर इतर पुस्तके मधोमध उघडून एकावर एक अशी ठेवावी. पुस्तकांऐवजी तुम्हाला नको असणाऱ्या किंवा जुन्या झालेल्या वह्यांचा वापर करून हे झाड बनवू शकता.

३. आठवणींचे झाड

तुम्ही घरात जर ख्रिसमस पार्टीचा प्लॅन केला असेल, तर हे आठवणींचे झाड अतिशय सुंदर मस्त पर्याय आहे. त्यासाठी तुमचे, तुमच्या मित्रांचे ग्रुप फोटो यांसारखे सर्व फोटो प्रिंट करून घ्या. त्यानंतर ख्रिसमस ट्रीच्या आकारानुसार, खाली सगळ्यात जास्त फोटो आणि वर सर्वात कमी, असे फोटो भिंतीवर चिकटवा. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला फेरी लाईट्स/ पिवळ्या दिव्यांच्या नाजूक माळांनी सजावट करा.

४. केवळ दिव्यांच्या माळा

जर तुमचा ऐनवेळी काही ख्रिसमस प्लॅन ठरला तर अशा ऐनवेळी दुकानांमध्ये जाण्यासाठी धावपळ करू नका. आपल्या घरात इतर सणांसाठी आणलेल्या दिव्यांच्या माळा असतात. अशा वेळेस एक दिव्याची माळ घेऊन तिचे एक टोक भिंतीला चिकटवून, ख्रिसमस ट्रीप्रमाणे आकार द्या. नंतर सर्वात वरती एखादी चांदणी चिकटवा.

५. कापडाचा वापर

सर्वात सोपा आणि कमी कष्ट असणारा हा उपाय सर्वांना आवडेल. त्यासाठी एखादी पातळ ओढणी किंवा पातळ [झिरझिरीत] साडी, यांची निवड करा. आता साडी किंवा ओढणीचा मध्यभाग खोलीच्या सिलिंग/छताला व्यवस्थित चिकटवून घ्या [वापरलेले कापड जमिनीपर्यंत येईल यांची काळजी घ्या]. आता या साडी किंवा ओढण्यांमधून तुम्हाला आवडणाऱ्या रंगांचे किंवा पांढऱ्या रंगाच्या दिव्यांच्या माळा सोडा. जमिनीवर काही वस्तू, भेटवस्तू किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींनी सजवाट करा.

अशा किंवा यांसारख्या भन्नाट, वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून तुम्ही तुमची खोली, घर किंवा ऑफिसमध्ये अगदी स्वस्त, झटपट आणि कमी खर्चात सजावट करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five amazing creative diy hacks to make and decorate your own christmas tree dha
Show comments