निरोगी आरोग्याच्यादृष्टीने आपल्या दिवसाची सुरुवात चहा-कॉफीने होऊ नये असं म्हटलं जातं. त्याऐवजी एखादं ताजं फळ किंवा ड्रायफ्रूट्स हा एक उत्तम पर्याय असू शकतो. पण फक्त सकाळीच नव्हे तर दिवसांतील अन्य काही वेळांमध्ये देखील ड्रायफ्रुटस खाणं आपल्या शरीरासाठी पोषक ठरतं. त्याचसोबत विशिष्ट ऋतूंनुसार, वातावरणातील बदलांनुसार देखील तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रुटस खाऊ शकता. सध्या पावसाळा सुरु आहे आणि या ऋतूत ओले खजूर शरीरासाठी उत्तम असतात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी स्वतः पावसाळ्यात ओले खजूर खाण्याचे असंख्य फायदे सांगितले आहेत. इंस्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून ऋजुता दिवेकर यांनी याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. हे फायदे नेमके कोणकोणते आहेत? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताजे खजूर खाण्याचे फायदे कोणते? ऋजुता दिवेकर म्हणतात…

  •  शरीरातील हिमोग्लोबिन आणि ऊर्जेची पातळीत सुधार
  •  झोपेशी संबंधित समस्यांवर उपचार म्हणून वापर
  • बहुतेक इन्फेक्शन आणि ऍलर्जीच्या समस्यांशी सामना
  • व्यायामादरम्यान लागणाऱ्या ऊर्जेत वाढ
  • बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून आराम
खजूर हे फायबर, पोटॅशियम आणि लोह याने समृद्ध असतात. तुम्हाला जर शुगर क्रेविंग होत असेल तर खजूर हा एक परिपूर्ण पर्याय आहे. इतकंच नव्हे तर संशोधनातून देखील असं समोर आलं आहे कि, खजुरामध्ये ग्लायसेमिक निर्देशांक कमी असल्याने डायबेटिक पेशंट्सदेखील हे ड्रायफ्रूट खाऊ शकतात. खजुरामध्ये असलेलं नैसर्गिक वनस्पती रसायन आपल्या शरीराचं कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मोठी मदत करतं.

खजूर खाण्याची दिवसातील सर्वोत्तम वेळ कोणती?

  • सकाळी उठल्यावर सर्वात आधी
  • दुपारच्या जेवणानंतर (तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी)
  • दिवसभरात मधल्या वेळी कधीही (विशेषतः तारुण्यात आलेल्या मुला-मुलींसाठी)
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर म्हणतात कि, “तुम्ही खाल ते खजूर हे ताजे आणि स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी केलेले असावेत. तुम्ही त्याच्या बिया तुमच्या घराच्या कंपाऊंडमध्ये देखील लावू शकता.”
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five reasons you must eat fresh dates monsoon gst