स्थुलपणा जगासमोरील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक समस्या आहे. आज अनेकजणांना स्थुलपणामुळे अनेक अडचणींचा समाना करावा लागत आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे, पहाटे जॉगिंगला जाणे, डाएट फॉलो करणे यासारखे अनेक उपाय अनेकजण करताना दिसतात. मात्र अनेकदा धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या तब्बेतीसाठी वेळ काढणे शक्य होतेच असे नाही. म्हणूनच दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलल्या तरी वजन कमी करता येते. रात्री झोपण्यापूर्वी रोज काही गोष्टी केल्यास तुम्ही अगदी सहजपणे वजन कमी करुन वजनावर नियंत्रणात ठेऊ शकता. जाणून घेऊयात या खास टीप्स
ग्रीन टी
रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. रात्रभर शरीर आराम करत असताना पचनक्रीया होत असते त्यामुळे ग्रीन टी प्यायल्यास ही पचनक्रीया अधीक चांगल्यापद्दतीने होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होते.
साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ न खाणे
साखर आणि ज्या पदार्थांमध्ये स्टार्च कार्बोहायड्रेट्स असतात असे पदार्थ इन्सुलिनचे विसर्ग होण्याच्या प्रक्रियेला उत्तेजना देतात. इन्सुलिन शरीरातील फॅट (मेद) स्टोरेज हार्मोन आहे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी असते तेव्हा शरीरात जमा झालेलं फॅट बर्न व्हायला सुरूवात होते. म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ टाळावेत. उदा. बटाटा, हिरवा वटाणा, भात, मका इत्यादी.
नो जंक फूड
रात्रीचे जेवण म्हणून पावभजी, वडापाव, सामोसा, पिझ्झा, पास्ता, बर्गर, फ्राईज असे तळलेले जंक फूड खाणे बंद करा. तसेच रात्रीच्या जेवणानंतर किंवा जेवणाबरोबर कोल्डड्रिंक पिणे टाळा. रात्रीच्यावेळी शरीराची जास्त हलचाल होत नाही आणि शरीरामधील पचनक्रिया काम करत असते. त्यात जंक फूड खालल्याने शरीरात गेलेले जास्त फॅट्स बर्न होत नाही आणि लठ्ठपणा वाढतो.
गरम पाणी प्यावे
रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याऐवजी गरम किंवा कोमट पाणी प्यावे. असे केल्यास पचनक्रीया जास्त सहज होते. तसेच झोपण्याआधी गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित विकार आणि समस्या बंद होतात आणि जास्तीचं फॅट बर्न होण्यास मदत होते.
झोप पूर्ण करा
झोपेचा आणि वजनाचा थेट संबंध आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पूर्ण झोप न मिळाल्यास वजन वाढते. झोपण्यापूर्वी काही वेळ शांतपणे बसावे. ध्यान करावे अथवा मंद संगीताचा आनंद घ्यावा. शक्य असल्यास झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे फ्रेश वाटते आणि बेडवर जाताना मन आणि शरीर प्रसन्न असल्यास चांगली झोप लागते. चांगली झोप घेतल्यास पचनक्रिया वेगाने आणि सहज होते. याचा परिणाम म्हणजे अतिरिक्त फॅट बर्न होण्यास मदत होते. योग्य वेळ झोप घेतल्यास शरीरातील संप्रेरकांचे प्रमाण टिकून राहते. आणि अशाप्रकारे संप्रेरकांचे प्रमाण योग्य असल्यास सतत भूक लागत नाही आणि शरीरातील उर्जाही टिकून राहते.