सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तसेच शिवाय शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते. त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. तथापि आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण रोखले जाऊ शकते. तुम्ही ताबडतोब तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. यासाठी आज आपण जवस तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कसे कमी करू शकते, हे जाणून घेणार आहोत.
अमेरिकन सोसायटी फॉर न्यूट्रिशनने २०१५ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, आहारात फ्लॅक्ससीडचे सेवन केल्याने शरीरातील वाढणारे कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच पेरिफेरल आर्टरी डिसीजची प्रगती रोखते. या संशोधनाच्या अगदी सुरुवातीस, टीमला पीएडी रुग्णांमध्ये फ्लॅक्ससीडमुळे खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण १५ टक्के कमी झाल्याचे आढळले, ज्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं.
जवसाचा शरीरावर होतेय चांगला प्रभाव
पेरिफेरल आर्टरी डिसीज असलेल्या लोकांमध्ये ग्राउंड फ्लेक्ससीड्स खराब कोलेस्टेरॉल कमी करतात आणि कोलेस्ट्रॉल-कमी करणार्या औषधांसोबत एकत्रित केल्यावर शरीरातील कोलेस्टेरॉलवर परिणाम न होता अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता त्यांच्यात असते. इतकंच नाही तर तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अंबाडीच्या बिया खूप चांगल्या आहेत यात शंका नाही. जवसामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे अनेक आजार दूर होतात. या कारणास्तव फ्लॅक्ससीड हे पृथ्वीवर आढळणारे सर्वात पौष्टिक अन्न आहे असे म्हटले जाते.
आणखी वाचा : Diabetes: ब्लड शुगर वाढताच त्वचेवर दिसतात ‘या’ खुणा; लगेच घ्या काळजी, अन्यथा होतील मोठे दुष्परिणाम
जवस ‘असे’ लढते कोलेस्टेरॉलशी
प्राचीन काळापासून लोक आपल्या आहारात जवसाचा वापर करत आहेत. जवस सोबत त्याचे तेल देखील वापरले जाते. ग्रीक, रोमन, इजिप्शियन, चिनी आणि भारतीय संस्कृतींमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फ्लेक्ससीडमध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड, विरघळणारे फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व पोषक खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कोलेस्टेरॉलच्या आजारावर जवस हे जादुई औषध
फ्लेक्ससीड्स अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (एएलए) मध्ये समृद्ध असतात, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. यासोबतच ते इकोसापेंटायनोइक अॅसिड (ईपीए) आणि डोकोसाहेक्साएनोइक अॅसिड (डीएचए) मध्ये समृद्ध आहे. हे तिन्ही ऍसिड खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओळखले जातात. म्हणूनच कोलेस्टेरॉलच्या आजारावर जवस हे जादुई औषध आहे.
जवस रोज किती खावे ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात एक चमचा जवसाचा वापर केला पाहिजे. पण फ्लॅक्ससीड कधीही कच्चे खाऊ नका, नेहमी आधी भाजून घ्या आणि नंतर खा. त्याचे फायदे मिळविण्यासाठी, ते योग्य स्वरूपात खाणे आवश्यक आहे. तुम्ही ते आणखी अनेक ड्रायफ्रूट्स आणि संपूर्ण बियांसोबत भाजून खाऊ शकता.
जवसाच्या बिया भाजून, बारीक करून, स्मूदी, हलवा, लापशी, लाडू आणि दह्यामध्ये मिसळूनही खाता येतात. सर्वसाधारणपणे, प्रत्येकाने जवसाच्या तेलाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही कारण त्यात आवश्यकतेपेक्षा जास्त ऍसिड असतात, जे चुकीच्या प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर देखील वाईट परिणाम होऊ शकतो. कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जवसाचे सेवन करावे. तुम्ही जर कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट घेत असाल, तर फ्लॅक्ससीड घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.