मधुमेह हा जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करणारा एक विकार आहे. यात व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते, ज्याचे गंभीर परिणाम रुग्णाला भोगावे लागतात. अशा परिस्थितीत मधुमेह असलेल्या रुग्णांनी आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी दररोज व्यायामासोबत संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. पण मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही अळशी या पदार्थाचा समावेश करू शकता. अनेक आवश्यक पोषक तत्त्वांनी समृद्ध असे अळशीचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अळशीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची अचानक वाढ होण्यास प्रतिबंध होतो. अळशीचे नियमित सेवन केल्याने मधुमेह असलेली व्यक्ती ग्लायसेमिकवर नियंत्रण मिळवू शकते आणि उच्च रक्तातील साखरेशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करू शकते. यामुळे रक्तदाब आणि वजन नियंत्रित राहते.

अन्नातील कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवते हे ग्लायसेमिक इंडेक्स मोजते. अळशीमध्ये खूप कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे, याचा अर्थ रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. तुमच्या आहारात अळशीचा समावेश केल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. ज्यामुळे मधुमेहाचे रुग्ण अनुकूल राहू शकतात.

अळशी हे ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे, विशेषत: अल्फा-लिनोलेनिक ॲसिड (एएलए) चा मोठा स्रोत आहे. ओमेगा-३ फॅटी ॲसिड त्यांच्या दाहकविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि ते सुधारित इन्सुलिन संवेदनशीलता आणि कमी इन्सुलिन प्रतिरोधकतेशी जोडलेले आहेत. तुमच्या आहारात अळशीचा समावेश केल्याने चयापचय आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागू शकतो, संभाव्यतः टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो आणि विद्यमान मधुमेह असलेल्या लोकांना मदत होऊ शकते.

अळशीमध्ये लिग्नॅन्स असतात, जे एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहेत, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ यांच्याशी लढण्यास मदत करतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अळशीमधील लिग्नन्स इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून आणि इन्सुलिन प्रतिरोधकता कमी करून रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर सकारात्मक परिणाम करू शकतात.

मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो. अळशीचे फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि लिग्नॅन्सचे अनोखे मिश्रण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायदे प्रदान करतात जे मधुमेह व्यवस्थापनास पूरक ठरू शकतात. संशोधन असे सूचित करते की, अळशीचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास आणि हृदयाच्या आरोग्याचे मार्कर सुधारण्यास मदत होते, तसेच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flaxseed for diabetes control 5 reasons to add them to your diet sjr