आपल्याकडे iPhone आयफोन असणे हे सध्या स्टेटस सिम्बॉल मानले जाते. त्यामध्ये असणारी फिचर्स, त्याच्या किंमती यांमुळे हा फोन कायमच चर्चेत असतो. महागडा म्हणून ओळखला जाणारा हा फोन तुम्हाला अगदी स्वस्तात मिळाला तर? त्यामुळेच तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरु शकते. कंपनीने नुकतीच एक विशेष ऑफर जाहीर केली आहे. त्यानुसार अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरुन आयफोनच्या खरेदीसाठी खास ऑफर देण्यात आली आहे.
अॅपलच्या iPhone se आयफोन एसईची आताची किंमत २६ हजार रुपये इतकी आहे. मात्र अॅमेझॉनवर हा फोन ग्राहकांना अवघ्या २८९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. ३२ जीबीच्या या फोनमध्ये ग्राहकांना ८००१ रुपयांची सूट देण्यात आली आहे. याशिवाय या फोनवर एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. म्हणजेच जे ग्राहक आपल्याकडील चांगल्या स्थितीतील स्मार्टफोन कंपनीला देईल त्यांना आणखी १५,१०० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हा फोन ग्राहकांना अवघ्या २८९९ रुपयांना मिळू शकेल. यामध्येही कोणता स्मार्टफोन किती रुपयांना घेतला जाईल याबाबतची माहिती अॅमेझॉनवर देण्यात आली आहे.
याबरोबरच फ्लिपकार्टवरही विशेष ऑफर देण्यात आली आहे. या साईटवर हा फोन ३ हजार रुपयांना उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टने आपल्या साईटवरुन फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे. याशिवाय १८ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांनी हा फोन फ्लिपकार्टवरुन खरेदी केल्यास त्यांना तो ३ हजार रुपयांना खरेदी करता येईल.
iPhone seचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये सध्या ऑपरेटींग सिस्टीम १० काम करते. मात्र ती अपग्रेड करण्याची सुविधा देण्यात आली असून ज्यांना आपला फोन अपग्रेड करायचा आहे त्यांच्यासाठी कंपनीने ११ ही ऑपरेटींग सिस्टीमही उपलब्ध करुन दिली आहे. याचा डिस्प्ले ४ इंचाचा असून २ जीबी रॅम देण्यात आली आहे. १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर फ्रंट कॅमेरा १.२ मेगापिक्सलचा देण्यात येणार आहे.