ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग कंपन्या सातत्याने नवनवीन ऑफर्स बाजारात दाखल करत असतात. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन कंपन्यांमध्ये तर सातत्याने वेगवेगळ्या ऑफर्ससाठी स्पर्धा सुरु असते. एका क्लिकवर आपल्याला हवी ती वस्तू उपलब्ध होत असल्याने ग्राहकही हल्ली ऑनलाईन शॉपिंग करण्याला प्राधान्य देतात. फ्लिपकार्टने नुकताच आपला सेल जाहीर केला असून त्यामध्ये ग्राहकांना नामांकित ब्रॅंडचे फोन कमी किमतीत मिळू शकणार आहेत. Flipkart Big Shopping Days Sale असे या सेलचे नाव असून यामध्ये ग्राहकांना एकाहून एक आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

६ ते ८ डिसेंबर या कालावधीत हा सेल सुरु असेल असे कंपनीने सांगितले आहे. तर या सेलसाठी कंपनीने एचडीएफसी या बँकेशी भागीदारी केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरुन पेमेंट केले तर ग्राहकांना १० टक्क्यांची सूट मिळणार आहे. एखादी वस्तू तुम्ही ईएमआयवर खरेदी केली तरीही तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ईएमआय, नो कॉस्ट ईएमआय यांसारख्या सुविधांबरोबरच कंपनीकडून एक्सचेंज ऑफरही देण्यात येणार आहे. Nokia 5.1 Plus हा फोन १०,९९९ रुपयांचा फोन ९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. Infinix Note 5 हा १०,९९९ रुपयांचा फोन ७,९९९ रुपयांना मिळणार आहे. याबरोबरच जेनफोन मॅक्स प्रो एम1, रेडमी नोट 5 प्रो, वीवो वी9 प्रो, नोकिया 6.1 प्लस यांसारख्या फोनवरही वेगवेगळ्या ऑफर्स मिळणार आहेत.

मोबाईलशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही विशेष सूट मिळणार आहे. टीव्ही आणि घरगुती वस्तूंवर ७० टक्के सूट, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८० टक्के, फॅशनशी निगडीत वस्तूंवर ४० ते ८० टक्के डिस्काऊंट मिळू शकणार आहे. घरातील फर्निचरवरही ४० ते ८० टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय ब्लॉक बस्टर डील्स, रश अवर्स, प्राइस कॅश यांसारख्या सुविधांचा लाभही घेता येणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टचा सेल हा तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आहे.