नवीन वर्षांसाठी काहीतरी शॉपिंग करण्याचा तुमचा विचार असेल तर महिना अखेरपर्यंत थांबणे फायद्याचे ठरणार आहे. १५ ते १७ डिसेंबर दरम्यान  देशातील काही बड्या ई-कॉमर्स कंपन्या मोठी सूट देण्याच्या तयारीत आहेत. याची सुरुवात होणार आहे भारतातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी असणाऱ्या फ्लिपकार्टच्या ‘न्यू पिंच डेस’ सेलने. १५ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान फ्लिपकार्ट ग्राहकांना ‘न्यू पिंच डेस’ सेलअंतर्गत अनेक गोष्टींवर मोठी सवलत देणार आहे.

कंपनीने या सेलबद्दल दिलेल्या माहितीनुसार फॅशन, घरगुती वस्तू आणि फर्निचर सेक्शनमधील सामानाच्या खरेदीवर ४० ते ८० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स, पुस्तके, सौंदर्यप्रसाधने, खेळण्यांवर या तीन दिवसांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. या विशेष सवलतीसह एडचीएफसीच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड होल्डर्सला सरसकट १० टक्के सवलत मिळेल.

स्मार्टफोनवर विशेष सवलती

या सेल दरम्यान स्मार्टफोनवर विशेष ऑफर्स उपलब्ध असतील. एलजीचा फ्लॅगशीप फोन असणारा ५५ हजारांच्या एलजी जी सीक्सवर चक्क २३ हजार रुपये सवलत मिळणार असून तो केवळ ३१ हजार ९९० रुपयांना उपलब्ध असेल.

गुगलचा या वर्षीचा फ्लॅगशीप फोन पिक्सल टू ३९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असेल. गुगलशिवाय एलजी आणि एचटीसीच्या फोनवर विशेष ऑफर्स वेबसाईटने देऊ केल्या आहेत. ५३ हजार ९९०चा एचटीसी यू ११ हा फोन ४४ हजार ९९९ला उपलब्ध असेल तर एलजीचा व्ही २० हा ६० हजारांचा फोन फक्त २४ हजार ९९० रुपयांना उपलब्ध होईल.

सॅमसंग आणि मोटोरोलावरही विशेष ऑफर्स देण्यात आल्या आहेत. नुकताच बाजारात आलेल्या मोटो झेड फोरवर दोन हजारांची सूट देण्यात येणार असल्याने तो २० हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होईल. तर मोटो झेड टू प्ले तीन हजारांची सवलत देण्यात येणार असल्याने २४ हजार ९९९ रुपयांना विकत घेता येईल.

सॅमसंगचा मागील वर्षीचा फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस सेव्हनही २४ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असेल. तर शिओमीचा सर्वात महागडा फोन एमआय मिक्स टू ३२ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होईल.

नुकताच लॉन्च झालेला हॉनर ९ आय आणि लिनोव्हो के ८ प्लसवर दोन हजार रुपयांची सरसकट सवलत देण्यात येईल. तर ओप्पो एफ थ्री प्लसचा ६ जीबी रॅम मॉडेल केवळ १७ हजार ९९० रुपयांना उपलब्ध असेल. या फोनवर पाच हजारांची सूट वेबसाईटने या तीन दिवसांसाठी देण्यात आली आहे.

Story img Loader