शाओमी कंपनीने मागील काही दिवसांत भारतात जोरदार कमाई करत आपले स्थान निर्माण केले आहे. नवनवीन मोबाईलद्वारे ग्राहकांना एकाहून एक आकर्षक फिचर्स देऊन कंपनीने आपल्या मोबाईलचा खप वाढवला आहे. यासोबतच वेगवेगळे सेल जाहीर केल्यानेही शाओमी फोनच्या विक्रीत वाढ झाली आहे. नुकताच कंपनीने एक अनोखा सेल जाहीर केला आहे, यामध्ये Redmi Note 5 Pro या स्मार्टफोनवर एक दोन नाही तर तब्बल १२ हजारांची सूट मिळणार आहे. Flipkart Mobile Bonanza sale असे या सेलचे नाव असून तो ठराविक कालावधीसाठीच उपलब्ध असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Redmi Note 5 Pro हा कंपनीचा गाजलेला मोबाईल आहे. या फोनची मूळ किंमत १२,९९९ रुपये असून त्यावर १२ हजारांची सूट मिळाल्यावर तो ९९९ रुपयांना खरेदी करता येईल. आजपासून ही ऑफर लागू होणार असून त्यावर आकर्षक डिस्काऊंट देण्यात आले आहे. तुमच्याकडे असलेला जुना स्मार्टफोन देऊन तुम्ही हा Redmi Note5 Pro फोन खरेदी करत असाल तर हे १२ हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना OnePlus, Motorola, Xiaomi आणि इतरही काही कंपन्यांच्या फोनवर जास्तीत जास्त एक्सचेंज ऑफर मिळू शकणार आहे. याशिवाय एसबीआयच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा खरेदीसाठी वापर केल्यास आणखी १० टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय हा फोन ईएमआयवरही खरेदी करता येणार आहे.

या फोनला ५.९९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. तर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसरसह येणारा हा शाओमीचा पहिला फोन आहे. यात ४ जीबी आणि ६ जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन उपलब्ध असून यामध्ये ६४ जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. Redmi Note 5 Pro मध्ये १२ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. अॅन्ड्रॉइडच्या ८.० ओरियोवर काम करणाऱ्या या फोनमध्ये ४००० मिलीअॅम्पियरची बॅटरी देण्यात आली आहे.