दिवाळी किंवा इतरही काही निमित्ताने ऑनलाईन शॉपिंग कंपन्या आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी आकर्षक ऑफर्स जाहीर करत असतात. फ्लिपकार्ट या कंपनीनेही येत्या २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान आपला सेल जाहीर केला आहे. या सेलचे नाव फेस्टीव धमाका सेल असे ठेवण्यात आले असून ग्राहकांना जवळपास १०० हून अधिक उत्पादनांवर सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही दिवाळीला काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी नक्कीच उत्तम संधी ठरेल. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स असणाऱ्यांना इतर ग्राहकांपेक्षा आधी या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. या ग्राहकांसाठी २३ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता सेल सुरु होणार आहे. तर अतरांसाठी २४ पासून सुरु होईल. यंदा फ्लिपकार्टने अॅक्सिस बँकेशी टायअप केले असून त्यावरुन व्यवहार करणाऱ्यांना डिस्काऊंट देण्यात येणार आहेत.

या सेलमध्ये मोबाईल, एलईडी टीव्ही, लॅपटॉप आणि इतर गोष्टींसाठी डिस्काऊंट देण्यात येणार आहे. यावर असणाऱ्या ऑफर्स दर ८ तासांनी रिफ्रेश करण्यात येणार आहेत. Oppo F9 हा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरीचा फोन १८,९९० रुपयांना ३ हजारांच्या डिस्काऊंटने मिळणार आहे. तर Vivo V9 ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरीचा फोन ८ हजारांच्या डिस्काऊंटने १५,९९० रुपयांना मिळणार आहे. यामध्ये एक्सचेंज ऑफर्स, बायबॅक गॅरंटी यांसारख्या सुविधाही मिळणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलमध्ये काही ऑफर्स दिल्या होत्या. त्यावेळी ज्यांच्याकडून या ऑफर्स सुटल्या असतील त्यांना आता संधी मिळणार आहे.

Consumer Protection Act 2019, defects in goods and services., Consumer Protection, Consumer Protection news,
ग्राहक राजा सतर्क हो…!
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
cash transactions restrictions
रोखीच्या व्यवहारांवरील निर्बंध काय आहेत?
vaccination campaign launched reduce obesity among obese unemployed youth In Britain
लठ्ठ बेरोजगारांचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर ‘बोजा’! सडपातळ आणि रोजगारक्षम बनवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवणार?
slow walking
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
Ratan Tatas significant investments helped startups to stand on thier own feet
स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?
air pollution control, Mumbai Municipal Corporation,
वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश
kalyani strategic systems collaborates with us defence companies
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल

इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जवळपास ८० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. ब्रँडेड कॅनन, सोनी, निकॉन यांसारख्या कंपन्यांच्या DSLR कॅमेरावर १५ हजारांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. वेगवेगळ्या ब्रँडच्या स्पिकर आणि हेडफोन्सवर ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. Intel Core i3 हा २७,४९० रुपयांचा लॅपटॉप ग्राहकांना २१,९९० रुपयांना मिळेल. तर सॅमसंगचा ३२ इंचाचा एचडी टीव्ही १५,९९९ रुपयांना मिळेल. याशिवायही आणखी बऱ्याच गोष्टींवर डिस्काऊंट मिळणार आहे.