ऑनलाईन शॉपिंग कंपन्या कायमच नवनवीन ऑफर्स आणून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये फ्लिपकार्ट अनेकदा आघाडीवर असते. कंपनीने नुकताच आपला ऑनलाईन शॉपिंग वीक जाहीर केला असून यामध्ये ग्राहकांना एकाहून एक आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. या ऑफर्स खासकरुन स्मार्टफोनसाठी करण्यात आल्या आहेत. याशिवाय आणखीही एक्सचेंज ऑफर्स मिळणार आहेत. यामध्ये जुना मोबाईल देऊन नवीन फोन खरेदी करायचा असल्यास तुम्हाला १ हजार रुपये जास्त मिळणार आहेत. याचा अर्थ तुमच्या फोनची एक्सचेंज किंमत ३००० रुपये असल्यास तुम्हाला या ऑफरमध्ये ४ हजार रुपये मिळतील. यातही कोणता जुना फोन किती रुपयांना मिळेल याची माहिती फ्लिपकार्टवर देण्यात आली आहे. याशिवाय मोबाईलला पूर्ण सुरक्षा देण्यात येणार आहे आणि त्यासाठी ग्राहकांना केवळ ९९ रुपये भरावे लागणार आहेत.

फ्लिपकार्टवर बेस्ट सेलर म्हणून गाजलेल्या Realme 2 Pro असून याची किंमत १२,९९० रुपये आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेला Redmi 6 आहे. या फोनची किंमत ८,४९९ रुपये आहे. Honor 9N हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. याच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी असलेल्या वेरियंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. हा फोन सेलमध्ये ८,४९९ रुपयांत विकला गेला आहे. तर १३,९९९ रुपयांचा Redmi note 6 pro १२,४९९ रुपयांना मिळत आहे. Vivo V11 Pro वर २५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर Vivo V9 Pro, Oppo F9 Pro वर २००० रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन मोबाईल घ्यायचा विचार करत असाल तर ही नक्कीच उत्तम संधी आहे.

 

Story img Loader