Floor Cleaning Hacks : दिवाळीची साफसफाई करताना फरशी चमकवणेही खूप कठीण काम असते. कारण कितीही घासली रगडली तरी फरशी काही नीट साफ होत नाही, त्यामुळे दिवाळीत फरशी न घासता, रगडता काही मिनिटांत स्वच्छ करण्यासाठी आम्ही खास ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.. यासाठी तुम्हाला फरशी पुसताना पाण्यात काही गोष्टी मिसळाव्या लागतील. ज्यामुळे फरशीवरील बुळबुळीतपणा, काळपट आणि चिकट डाग तर दूर होईलच शिवाय घरातील झुरळ, किटक देखील पळून जातील.

चिकट, बुळबुळीत फरशी कशी स्वच्छ करावी?

किचनमध्ये सहज मिळणाऱ्या काही गोष्टी वापरुन तुम्ही फरशी स्वच्छ करण्याचे काम सोपे करू शकतात. यासाठी अर्धी पाण्याने भरलेल्या बादलीत एक चमचा व्हिनेगर, दोन चमचे बेकिंग सोडा आणि एक चमचा डिशवॉश लिक्विड मिसळा. आता तुम्ही या पाण्याने संपूर्ण घरातील फरशी पुसून घ्या. अशाप्रकारे घरातील फरशी स्वच्छ होईलच शिवाय लपून बसलेले झुरळ, किटकही नाहीशे होतील.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड

फरशी स्वच्छ करण्याची दुसरी ट्रिक

पाण्याने फरशी पुसायला गेलात तर ती चांगल्याप्रकारे स्वच्छ होणार नाही. तसेच फरशी पुसण्यासाठी वापरत असलेला कपडा आधी स्वच्छ करुन घेत जा. यानंतर एका बादलीत अर्धा लिंबू पिळून घ्या. त्यात कपडा टाकून फरशी पुसून घ्या. यामुळे फरशी चमकण्यात मदत होईल, शिवाय फरशीवरील डाग निघून जातील आणि किटाणू देखील नष्ट होतील.

गरम पाण्याच्या मदतीनेही तुम्ही फरशी चमकवू शकता. अनेकदा सिलिंडर आणि तेलाच्या कॅनमुळे फरशी खूप काळी आणि तेलकट होते. अशावेळी गरम पाण्यात डिटर्जंट पावडर मिसळा आणि त्या पाण्याने फरशी स्वच्छ पुसून घ्या. अशाने फरशी अगदी नव्यासारखी चमकून निघेल.

फरशी पुसण्यसाठी तुम्ही ब्लिचचा देखील वापर करु शकता. याने फरशी तर स्वच्छ होईलच शिवाय फरशीवरील बॅक्टेरिया देखील मरतील. यासाठी अर्ध्या बादली पाण्यात १ झाकण ब्लिच मिसळा त्यात १ चमचा डिटर्जंट पावडर घाला आणि १० मिनिटे हे मिश्रण तसेच राहू द्या, यानंतर ते फरशीवर टाकून पसरवा आणि फरशी नीट स्वच्छ पाण्याने धुवा.