flour Face Packs: आपल्या स्वयंपाक घरामध्ये अनेक पदार्थ, मसाले किंवा पीठे अशी असतात जी आपल्या त्वचेच्या काळजीसाठी देखील उपयुक्त ठरतात. बेसन पीठ, हळद, तांदळाचे पीठ आणि अन्य गोष्टी या आपल्या त्वचेसत्ताही उपयुक्त ठरतात. आज आपण तांदळाच्या पिठाबद्दल जाणून घेणार आहोत. तांदळाचे पिठाचा वापर करून आपण अनेक चांगले स्वादिष्ट पदार्थ खात असतो. तांदळाच्या पिठामध्ये अनेक गुणधर्म असतात ते त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी इत्यादी गुणधर्म असतात. तसाच तांदळाच्या पिठाचा त्वचेसाठी कसे फायदा होतो ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तांदळाच्या पिठामुळे त्वचा चांगली होते. चेहरा उजळतो, चेहरा स्वच्छ होतो. तसेच त्वचेवरील मृत पेशी दूर होतात. तांदळाचे पीठ कशाप्रकारे चेहऱ्यावर लावता येऊ शकते ते पाहुयात.

हेही वाचा : इंटरनेट डेटा कमी वापरता? मग १ जीबी डेटा असणारे एकदा Airtel चे ‘हे’ प्लॅन्स वापरून पाहाच

तांदळाचे पीठ आणि दूध

तांदळाचे पीठ आणि दूध एकत्रित मिसळून एक चांगला फेस पॅक तयार करता येऊ शकतो. याचा वापर तुम्ही चेहरा आणि पायांवरही करू शकता. फेसपॅक तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार दुधामध्ये २ चमचे तांदळाचे पीठ मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावून ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवावा. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

अंडी आणि तांदळाचे पीठ

जर का तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसत असतील तर तांदळाचे पीठ आणि अंड्यातील पंधरा भाग मिक्स करून फेस पॅक तयार करता येऊ शकतो. या फेस पॅक तयार करण्यासाठी तांदळाच्या पिठात दोन अंड्यांचा पांढरा भाग मिक्स करून एक घट्ट अशी पेस्ट तयार करावी. ही पेस्ट काही काळ चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळाने चेहरा धुवावा.

कोरफड आणि तांदळाचे पीठ

त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यासाठी कोरफड आणि तांदळाच्या पिठाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावला जातो. हा फेस पॅक तयार करणे खूपच सोपे आहे. यासाठी तांदळाच्या पिठामध्ये २ चमचे कोरफड मिक्स करावी. त्याची एकत्रिपटपणे पेस्ट तयार करावी. ही पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावावा आणि थोड्या वेळाने चेहरा धुवावा. चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर चमक दिसू लागेल.

हेही वाचा : भारतात iPhone 15 Series च्या प्री बुकिंगला सुरुवात; ‘या’ मॉडेल्सवर मिळतोय ५ हजारांचा कॅशबॅक, ऑफर्स एकदा पाहाच

तांदळाचे पीठ आणि टोमॅटो

जर का तुमच्या त्वचेवर डाग आले असतील तर हा फेस पॅक तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी तांदळाचे पीठ आणि गव्हाचे पीठ समान प्रमाणात घ्यावे. त्यामध्ये टोमॅटोचा रस मिसळून मिश्रण एकत्र करावे. फेस पॅक घट्ट असेल त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. हे मिश्रण १५ मिनिटे चेहऱ्यावर लावावे. १५ मिनिटांनी चेहरा धुतल्यानंतर तुमचा चेहऱ्यावर तेज आलेले पाहायला मिळेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flour face pack with tomato milk egg aloe vera apply on face skin glow beauty tips tmb 01