Flowers Garden at Home Balcony: इन्स्टाग्रामवर दिसणाऱ्या रील्समध्ये तुम्ही आजपर्यंत घर कसं सजवायचं याच्या अनेक टिप्स पाहिल्या असतील. आपलंही घर तसं फॅन्सी असावं, घरी आल्यावर प्रसन्न वाटावं, अशी आपली पण इच्छा असते. अगदी छोटं का होईना जसंही घर असेल त्याच्या खिडकीत, दारापाशी एक तरी फुलझाडं लावण्याची अनेकांना हौस असते. तुम्हीही जेव्हा हौशीने ही फुलझाडं आणता तेव्हा त्याला सुरवातीला छान बहर आलेला असतो पण एक दोन वेळा फुलं येऊन गेल्यावर मात्र एकही फुल येत नाही. मग नुसतीच वेल वाढत जाऊन दारा- खिडक्यांमध्ये अडचणच वाढू लागते. अशावेळी तुमच्या दारात पसरलेली वेल छान सुंदर फुलांनी मोहरून जावी यासाठी आपण एक घरगुती जुगाड पाहणार आहोत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फुलझाडांना फुलं येण्यासाठी करायच्या जुगाडात आपल्याला अजिबात वेगळा खर्च करायचा नाहीये उलट आपल्याच घरात बनणाऱ्या चहाची वापरून झालेली पावडर वापरायची आहे. चहा गाळून झाल्यावर जी उकळलेली चहा पावडर गाळणीत उरते तीच तुम्हाला कुंडीत टाकायची आहे. चहाच्या पावडरमध्ये पोटॅशियम असल्याने यामुळे हे एक नैसर्गिक खत म्हणून काम करते.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजेच कळ्या यायला सुरुवात झाल्यावर तुम्ही फुलझाडांच्या कुंडीत प्रमाणाच्या पेक्षा जास्त पाणी घालू नका यामुळे मातीतील चांगले पोषक तत्व वाहून जाऊ शकते. माती अधून मधून वर खाली करा व मग त्यात ओलावा राहील एवढंच पाणी घाला.

हे ही वाचा<< तुमच्या बॅगेत ‘हा’ एक छोटा डब्बा असल्यास थंडीत होईल मोठी मदत! पोट व हाडं मानतील आभार

अगदी शून्य खर्चात होणारा हा जुगाड तुम्हीही वापरून पाहा आणि त्याचा रिझल्ट कसा येतोय हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flowers garden at home balcony grow roses zendu jaswandi at home with simple five rupees jugaad watch simple home tips svs
Show comments