आपली नखे सुंदर आणि मजबूत दिसावीत अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याकरिता प्रत्येकजण काही न काही नखांसाठी उपचार करत असतात. नखे सुंदर दिसण्यासाठी महागडे उपचार घेण्यापेक्षा घरगुती असे काही उपाय आहेत, जे नखांना मजबुती देतात. नखांचे सौंदर्य वाढवतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे घरगुती उपाय कोणते? आणि ते कसे करावे? तर मग जाणून घेऊ नखांना कशा प्रकारे मजबूत आणि चमकदार बनवता येतील.
नखे मजबूत कसे करावे
काही लोकांना दाताने नखे कुरतळण्याची सवय असते. पण हे चुकीचे आहे.नखांचे आरोग्य तर बिघडतेच पण नखांची घाणही तोंडात जाऊ शकते. याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे हे करणे टाळा.
नखांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेलाने मसाज करा. नारळाच्या तेलाच्या मसाजने नखे मजबूत तर होतातच पण नखे चमकदारही राहतात.
तुम्ही नखे फायलिंग करत असता तर एकाच दिशेने करा. तुम्ही विरुद्ध दिशेने फायलिंग करण्याचा प्रयत्न कराल तर नखे कमकुवत होत लवकर तुटतील. त्यामुळे एकाच दिशेने नेल फायलिंग करावे.
जर तुम्हाला तुमच्या नखांना लावलेली नेल पेंट काढायचा असेल तर त्यासाठी तुम्ही नेल पेंट रिमूव्हर वापरा. काही लोकांना सवय असते की ते नखे खरवडून नेल पेंट काढतात. असे केल्याने नखे कमकुवत होऊ शकतात.
जर तुम्हाला नखांना मजबूत बनवायचे असतील तर सर्वात आधी तुमच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करा. यासोबतच तुम्ही तुमच्या आहारात सोयाबीन, धान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, आवश्यक पोषक इत्यादींचा समावेश करा. असे केल्याने नखे मजबूत करता येतात.
यासह वेळोवेळी नखांची स्वच्छता राखावी. नाही तर ते कमकुवत होतात. सोबतच नखांना छोटे ठेवावे यासाठी तुम्ही ट्रिमिंगची मदत घेऊ शकतात.