अलिकडे लोकं असण्यापेक्षा दिसण्याला अधिक महत्वं देतात. नीटनेटकेपणा यामुळं तुमचं व्यक्तीमत्व अधिक उठून दिसतं. त्यामुळं प्रत्येकालाच कपडे आपल्याला शोभून दिसणारे असावेत असं वाटतं. याचबरोबर ते दीर्घकाळ टिकावेत आणि स्वच्छ राहावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते; मात्र, अनेकदा या कपड्यांची काळजी कशी घ्यावी? नेमकं हेच माहीत नसल्यामुळे कपडे लवकर खराब होतात. म्हणूनच तुमचे कपडे दीर्घकाळ टिकावेत त्यातून तुमच्या पैशांची बचत कशी करता येईल? हाच मुद्दा घेऊन आम्ही आपल्याला यासंदर्भात महत्वपूर्ण टिप्स देणार आहोत. चला तर जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कपडे लवकर खराब होण्याची कारणे ?

कपड्यांची काळजी कशी घ्यावी हे माहित नसल्याने आपल्या हातून काही चूका होतात. आपण सतत या तीन चूका करतो.

१. वॉशिंग मशीनचा वारंवार वापर.

२. ड्रायर मध्ये कपडे धूणे.

३. नियमितपणे इस्त्री करणे.

यंत्रांमुळे आपले जीवन सुकर झाले आहे यात शंका नाही. ही यंत्रे एका मर्यादेपर्यंतच वापरली गेली तर चांगलेच आहे, त्याचा अतिवापर झाला तर कपडे खराब होण्याची खात्री आहे. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत या यंत्रांचा वापर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

आणखी वाचा : केस धुताना सावधान! पार्लरमध्ये केस धुतल्याने मृत्यूला आमंत्रण; काय आहे नेमकं प्रकरण…?

अशी’ घ्या कपड्यांची काळजी

  • कपडे धुण्यासाठी फॅब्रिक कंडिशनरचा वापर करा. नाजूक कपडे धुण्यासाठी शक्यतो फॅब्रिक कंडिशनरचा वापर करावा.
  • कपड्यांना उन्हात वाळत घालू नका. जर तुमचे कपडे नाजूक फॅब्रिकपासून बनलेले असतील तर अशी कपडे उन्हात वाळत घालू नका. जर उन्हात वाळत टाकणं गरजेचे असेल तर कपडे उलटे वाळत घाला.
  • कपडे वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर टाळा. ड्रायरच्या वापराने कपड्यांचा रंग लगेच उतरतो. त्यामुळे ड्रायरचा वापर करण्यापेक्षा मोकळ्या हवेत कपडे सुकवा.
  • जर तुमच्या कपड्यांना डाग लागले तर कपडे धुताना मिठाचा वापर करा.
  • डिटर्जंटचा वापर कमी करा. डिटर्जंट जितका कमी वापरला जाईल तितके कपडे चांगले असतील. अनेक डिटर्जंट्समध्ये टाकाऊ रसायनांचा वापर होत असल्याने कपडे फाटण्याची, आकुंचन पावण्याची आणि रंग खराब होण्याची भीती असते.