तेजस्वी आणि नितळ त्वचा प्रत्येकालाच आवडते. मात्र, वयाच्या ३० वर्षांनंतर त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या वयात त्वचा वेगाने बदलत असते. हे बदल एजिंगशी संबंधित असतात. जर वेळेतच या बदलांकडे लक्ष दिले नाही तर त्वचा निस्तेज दिसू शकते. या वयात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही त्वचेला एजिंगच्या लक्षणांपासून दूर करू शकता.
स्किन केअरसोबतच जीवनशैलीचाही त्वचेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. म्हणूनच त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्ससोबतच, निरोगी जीवनशैली आणि चांगला आहार घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण जाणून घेऊया वयाच्या ३० व्या वर्षी त्वचा तरुण आणि सुंदर ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरता येतील.
Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे
- उत्पादनांचे घटक तपासा. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, अधिक चांगल्या घटकांचा समावेश असलेली उत्पादने घ्या. विशेष म्हणजे, हे उत्पादन तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार असावे.
- सूर्याची हानिकारक किरणे देखील त्वचा अकाली वृद्ध बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सनस्क्रीनचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करायला विसरू नका. घरी असतानाही ते वापरणे महत्त्वाचे आहे.
- निरोगी त्वचेसाठी पौष्टिक आहार घ्या कारण जर शरीरात पौष्टिकतेची कमतरता असेल तर ती लक्षणे त्वचेवर देखील दिसू शकतात. त्यामुळे तुमच्या आहारात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
- रुटीन स्किन केअर व्यतिरिक्त, त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा फेशियल मास्क, पील ऑफ आणि स्क्रब करणे यासारख्या गोष्टी करा. ते त्वचेला हायड्रेट करते आणि त्वचा चमकदार बनवते.
- जेवणात जास्त साखर वापरू नका. हे तुमचे वृद्धत्व वाढवते. या सर्वांशिवाय तुमच्या दिनक्रमात व्यायामाचा समावेश करा. तंदुरुस्त राहून तुम्ही वृद्धत्वाच्या समस्येवर काही प्रमाणात मात करू शकता.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)