मधुमेहाचा आजार आता आपल्या सगळ्यांना चांगलाच माहीत झाला आहे. प्रत्येकी दहा जणांच्यामागे ५ ते ६ जण मधुमेहाच्या समस्येने ग्रासलेले आहेत. त्यात आपल्या भारतात मधुमेह असलेल्यांची संख्या जास्त आहे. मधुमेहाच्या टाईप-१ आणि टाईप-२ या श्रेणीतील रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. मधुमेह टाळण्याकरिता वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. आपण खाताना आपल्याला किती अन्नाची गरज आहे हे जाणून व समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अन्नाची निवडही बरोबर केली पाहिजे. त्याचबरोबर पथ्य पाळणेदेखील महत्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे सहा सोपे नियम..

योग्य आहार घ्या

तुमच्या आहारातील चरबीयुक्त पदार्थ असतील, तर ते कमी करावेत. विशेषत: सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्स पदार्थ टाळावेत. फळं, भाज्या आणि तंतुमय पदार्थ असलेला आहार नियमित घ्यावा. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताजे घटक वापरून घरी तयार केलेल्या पदार्थांवर  खाण्याचा भर असावा.

नियमित व्यायाम करा

आता आहाराबरोबर योग्य व नियमित व्यायाम करणे देखील तेवढेच फायदेशीर ठरू शकते. दररोज किमान ३० मिनिटे व्यायम करा. यामुळे वजन नियंत्रणात राहते, रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते तसेच रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलमध्येही सुधारणा होते. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त किंवा कमी असेल तर व्यायाम करणे टाळा. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शक्यतो चालण्याचाच व्यायाम करावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित आणा

अलीकडे अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याची समस्या ऐकायवा मिळते. जेव्हा एलडीएलची पातळी सामान्यपेक्षा जास्त असेल तेव्हाच अशी परिस्थिती उदभवते. न तपासल्यास आरोग्याविषयीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. बॅड कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्ताचा मुक्त प्रवाह मर्यादित होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. फास्ट फूड, बर्गर, पिझ्झा, तळलेले स्नॅक्स यासारखे पदार्थ खाण्याचे टाळावे.

रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा

उष्ण तापमानात शरीरात इन्सुलिन वापरण्याच्या यंत्रणेत बदल होतो. त्यामुळे मधुमेहींनी रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार तपासून इन्सुलिनचा डोस व्यवस्थित घ्यावा. बहुतेक वेळा लोक जेवणाच्या अर्धा तास किंवा जेवल्यावर एक तासाच्या नंतर रक्तातील साखर तपासतात, ही गोष्ट बरोबर मानली जाते. जेवण किंवा न्याहारीनंतर ताबडतोब चाचणी केल्यास आपल्या साखर पातळीत नेहमीच दिसून येते. जर आपल्याला योग्य नोंद हवी असेल, तर आपण खाण्यापूर्वी तपासणी करणे चांगले. किंवा खाल्ल्यानंतर किमान दोन तास थांबा.

वेळेवर आणि नियमितपणे औषधं घ्या

मधुमेहाच निदान झाल्यानंतर डॉक्टर त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेण्याची शिफारस करतात. त्यामुळे आपण नियमित व वेळेवर औषध घेतली पाहिजे. आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे.

अतिरिक्त वजन कमी करा

अतिरिक्त वजन कमी केल्यास ते आपल्या आरोग्यासाठीदेखील चांगले आहे. यामुळे मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमेली डॉक्टरचा अथवा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Story img Loader