काही दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली आहे. यासोबतच थंडीचा परिणाम लोकांच्या त्वचेवरही होऊ लागला आहे. हिवाळ्यात त्वचेची सर्वात सामान्य समस्या म्हणजे त्वचा कोरडी पडणे. थंड वारा आणि कोरड्या हवामानामुळे त्वचा कोरडी पडते आणि तडे जाऊ लागतात. त्वचा केवळ कोरडी होत नाही तर निर्जीव आणि रंगहीन दिसते. अशा परिस्थितीत, हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. हिवाळ्यात या स्किन केअर टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॉइश्चरायझर

हिवाळ्यात त्वचेवर मॉइश्चरायझर जरूर वापरावे. कारण त्यामुळे त्वचेत आर्द्रता टिकून राहते. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही व्हिटॅमिन-ई असलेले मॉइश्चरायझर वापरू शकता.

नारळाचे तेल

नारळाचे तेल त्वचेसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. त्वचेला निरोगी बनवण्यासोबतच त्वचेचा रंगही उजळतो. हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी नारळाचे तेल अंगावर चोळा. इच्छित असल्यास, अंघोळ करण्यापूर्वी थोडा वेळ अंगावर नारळाचे तेल लावा. नंतर आंघोळ करा.

माइल्ड स्क्रब

हिवाळ्यात, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही माइल्ड स्क्रब वापरू शकता. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि त्वचा चमकदार बनवते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरीच माइल्ड स्क्रब बनवून वापरू शकता.

मिल्क मसाज

कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दुधाने मसाज देखील करू शकता. कारण दूध नैसर्गिकरीत्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. दुधाने त्वचेवर हाताने मसाज करा. त्यानंतर त्वचा कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीही त्वचेवर दुधाने मसाज करून तुम्ही वापरू शकता.

फाटलेले ओठ टाळण्यासाठी

हिवाळ्यात ओठ तडकू नयेत म्हणून तुम्ही नैसर्गिक लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली वापरू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow these tips to make your skin glowing in winter skin care routine scsm