Holi 2022: मार्च महिना आला की प्रत्येकजण होळीची आतुरतेने वाट पाहत असतो. रंगांच्या या सणावर मित्र-मैत्रिणींसोबत मौजमजा करण्याचे नियोजनही सुरू झाले आहे. तर दुसरीकडे काही लोक रंग खेळण्याआधीच त्यांच्या साइड इफेक्ट्समुळे चिंतेत आहेत. या साइड इफेक्ट्सवर त्यांनी आतापासूनच उपाय शोधायला सुरुवातही केली आहे. होळीमध्ये खासकरून डोळ्यांचा रंगांपासून बचाव करणे फारच आवश्यक असते. कारण डोळे हे आपल्या शरीरातील नाजूक अवयवांपैकी एक आहेत. म्हणूनच होळी खेळताना खबरदारी घेतल्यास तुम्ही डोळ्यांचा बचाव करण्यात यशस्वी होऊ शकता. होळी खेळताना डोळ्यांचा बचाव कसा करता येईल, जाणून घेऊया.
डोळ्याच्या आजूबाजूला तेल लावा:
होळी खेळण्याआधी तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला तेल लावा. तेल लावल्याने रंग सहजपणे निघतोही, तसेच डोळ्यांवर पडणारा रंग पापण्यांवरच चिटकतो. यामुळे डोळ्यांचा बचाव होतो. यासाठी तुम्ही राईचे तेल, नारळाचे तेल किंवा कोणतेही क्रिम वापरू शकता.
डोळे धुवू नका:
अनेकदा डोळ्यात रंग गेल्यानंतर काही लोक पाण्याचा वापर करून डोळे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे करणे चुकीचे ठरू शकते. खरंतर डोळ्यात पाणी गेल्यावर रंग अजून पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांना अधिक त्रास होऊ शकतो. म्हणून डोळ्यातील रंग काढण्यासाठी आयक्लिनर ड्रॉप्सचा वापर करावा.
जाणून घ्या : होळी सणामध्ये रंगांचा समावेश होण्यामागची रंजक गोष्ट
डोळे चोळू नका:
डोळ्यांमध्ये रंग गेल्यास डोळे चोळू नका. असे केल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते आणि डोळ्यांना खाज येऊ शकते. डोळ्यांमध्ये रंग गेल्यास एखाद्या कॉटनच्या कपड्याच्या मदतीने हलक्या हाताने हळू हळू डोळे स्वच्छ करा आणि डोळ्यांमध्ये आय ड्रॉप्स टाका. यामुळे तुमच्या डोळ्यातील रंग सहज निघून जाईल.
लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स:
तज्ञांनुसार, डोळ्यांचा रंगांपासून बचाव करण्यासाठी डोळ्यांमध्ये दोन थेंब लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स घालावेत. यामुळे डोळे स्वच्छ होतात आणि डोळ्यांवर रंगांचा साइड इफेक्ट होत नाही.
काळजीपूर्वक रंग खेळा:
होळीच्या दिवशी रंग टाळण्याच्या धडपडीत रंग पाहून आपण अनेकदा धावतो. मात्र, अशा स्थितीत बळजबरीने रंगाचा वापर केल्याने डोळ्यात रंग येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रंग पाहून पळून जाऊ नका आणि आरामात रंग लावा.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)