दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. घरोघरी दिवाळीसाठी चमचमीत फराळाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. चकली, करंजा, शंकरपाळी, बिस्किट, लाडू, चिवडा आदी जास्त फॅट्स असणारे फराळ आपण दिवाळीत बनवतो. पण या पदार्थांमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या अशा पदार्थांमुळे वजनाचं टेन्शन येऊ नये, म्हणून आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचा फराळ डाएटला साजेसा असा बनवू शकाल. जाणून घ्या सोप्या टिप्स…
गुळाचा वापर
दिवाळीत तुम्ही घरी गोड पदार्थ बनवत असाल तर साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता. साखरेऐवजी गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर मधही तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
मोहरीचे तेल
जर तुम्ही रिफाइंड तूप वापरत असाल तर त्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचे तेल वापरा. ते तुपापेक्षा आरोग्यदायी आहे. ते कमीत कमी प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करा.
आणखी वाचा : दिवाळीला देवाऱ्यात ‘अशी’ करा स्वच्छता; आकर्षक दिसेल मूर्तीं!
नॉन स्टिक कुकिंग वेअर
नॉन-स्टिक कुकिंग वेअरमध्ये तेल किंवा तुपाचा वापर कमी असतो आणि अन्न सहज तयार होते. नॉन स्टिक कुकिंग वेअर वापरत असाल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
सैंधव मीठ किंवा काळे मीठ
मीठ देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, म्हणून तुम्ही खारट पदार्थांमध्ये सैंधव मीठ किंवा काळे मीठ वापरावे. त्यामुळे बीपीच्या रुग्णांचे बीपीही नियंत्रणात येईल आणि बाकीच्या लोकांच्या शरीरात जास्त मीठ जाणार नाही.