कामाचा ताण, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, वातावरणात होणारे बदल, प्रदूषण हा सगळ्या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर आणि चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. आपण रुटीनमध्ये त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर पिंपल्स, पुरळ येणे, डार्क सर्कल अशा समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ जर तुम्ही मेकअप काढल्याशिवाय तसेच झोपलात तर तुमची त्वचा निस्तेज होण्याबरोबर त्वचेला आवश्यक असणारे पोषण मिळणार नाही. कारण चेहऱ्यावर मेकअपचा थर तसाच असेल. यामुळे एक योग्य रुटीन असणे आवश्यक असते. त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही रुटीनमध्ये पुढील गोष्टींचा समावेश करू शकता.

चेहऱ्यावर लावलेला मेकअप आठवणीने काढा
चेहऱ्याच्या त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी दररोज रात्री मेकअप काढणे गरजेचे असते. जर मेकअप तसाच राहिला तर चेहरा निस्तेज होण्याबरोबर चेहऱ्याशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी दररोज झोपण्यापुर्वी मेकअप काढण्याचे लक्षात ठेवा.यासाठी मेकअप रीमुवरचा वापर करू शकता.

क्लीनजर
मेकअप काढल्यानंतर क्लीनजर वापरणे त्यांनतरची महत्त्वाची गोष्ट आहे. क्लीनजर म्हणजेच त्वचा स्वच्छ करणे. दिवसभरात त्वचेवर धुळ, प्रदूषण यांमुळे त्वचेचे नुकसान करणारे घटक जमा होतात, यापासून त्वचेला नुकसान होऊ नये यासाठी क्लीनजर वापरण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी क्लीनजर बाजारात उपलब्ध असतात. ते वापरून त्वचा स्वच्छ करता येते.

आणखी वाचा : दररोज १०,००० पाऊले चालण्यासाठी या सवयी करतील मदत; लगेच करा बदल

टोनर
त्वचेवर टोनर वापरल्याने त्वचा हायड्रेट होण्यास, तसेच स्वच्छ होण्यास मदत मिळते. तुमच्या त्वचेला सूट होईल असा, अल्कोहोल नसणाऱ्या टोनरची निवड करा.

सिरम
सिरम निस्तेज त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी गुणकारी पर्याय मानला जातो. दिवसाच्या आणि रात्रीच्या अशा दोन्ही स्किन केअर रुटीनमध्ये सिरम महत्त्वाची भूमिका बजावते. चेहऱ्यावरील फाईन लाईन्स, रिंकल्सपासून सुटका मिळवण्यासाठी सिरम मदत करते.

मॉइश्चरायझर
मॉइश्चरायझर हा स्किन केअर रुटीनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेला योग्य पोषण मिळण्यास आणि त्वचा चमकदार बनण्यासाठी मदत मिळते.

Story img Loader