हिंडणे फिरणे सर्वांनाच आवडते. आता सुट्ट्यांच्या काळही सुरु आहे. अशातच प्रत्येकजण सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचे मनसुबे आखत आहे. सध्या सोलो ट्रिपचा ट्रेंड सुरु आहे. भारतात हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. एकट्यानेच फिरायला निघून जाणं याचाही वेगळाच अनुभव आहे. परंतु एकट्याने प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही सोलो ट्रिपला जायची इच्छा असेल तर तुम्हाला विशेष तयारी करावी लागू शकते. ही तयारी न केल्यास तुम्हाला काही लहान लहान अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज आपण जाणून घेऊया तुमची सोलो ट्रिप खास बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे असेल त्या ठिकाणचे बजेट तयार करा. या बजेटमध्ये येण्या-जाण्याचा खर्च, राहण्याचा आणि खाण्याचा खर्च यांचा समावेश असेल. एकदा का तुमचं बजेट निश्चित झालं की तुम्ही त्यानुसार पैसे साठवण्यास सुरुवात करा, जेणे करून तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय खर्च करू शकता.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात, तिथे जाण्याआधी तिथले हवामान, तिथे घातले जाणारे कपडे, औषधे आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत माहिती मिळावा. त्या ठिकाणी कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे आहेत हे माहित करून घ्या. तुम्हाला ही सर्व माहिती ऑनलाइन मिळू शकते.

जेव्हा पॅकिंग करायची वेळ येते, तेव्हा फक्त महत्त्वाच्याच गोष्टी पॅक करणे अतिशय आवश्यक आहे. कारण, असे केल्याने जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तुम्हाला बॅग घेऊन फिरणे सोपे होते. पॅकिंग करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की बहुतांश गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला आपण फिरायला जाणार आहोत त्या शहरात सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टी विनाकारण घेऊन फिरणे योग्य नाही.

जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणच्या हॉटेल, हॉस्टेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला रूम देण्याआधी तुमचा बुकिंग आयडी विचारला जातो. अशावेळी आधारकार्ड, वोटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एखादी गोष्ट जवळ असणे आवश्यक आहे. तुम्ही त्यांची सॉफ्टकॉपीही आपल्यासोबत ठेवू शकता.

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात, तिथे राहण्यासाठी आधीच बुकिंग करून ठेवणे फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला राहण्याच्या ठिकाणी जास्त अडचणींचा सामाना करावा लागणार नाही. तुम्ही निश्चिंत कोणत्याही काळजीशिवाय तिथे फिरू शकता. आधीच बुकिंग करून ठेवण्याचा एक फायदा असा की तुम्हाला हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसकडून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ उचलता येऊ शकतो.

सोलो ट्रिपला गेल्यावर तिथल्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना भेटणे, त्यांची संस्कृती जवळून पाहणे यात खरी मजा आहे. जमल्यास तिथल्या स्थानिक मंदिर आणि धार्मिक स्थळांना भेट द्या. यामुळे तुम्हाला या भागाची अधिक माहिती मिळण्यास मदत होईल. तुम्ही त्या शहरात प्रवास करण्यासाठी स्थानिक परिवहन साधनांचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला एक वेगळा अनुभवही मिळेल आणि तुमचा प्रवासाचा खर्चही वाचेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow this simple trips for you solo trip your travel will become more comfortable and easy pvp