खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचा मुद्दा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. तुपापासून डाळींपर्यंत प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे भेसळ करतच असतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी साध्या आणि पांढर्‍या शुभ्र दिसणार्‍या मैदयात देखील भेसळ होण्याची शक्यता असते. त्यातच आता काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपलेला आहे. या दिवसात प्रत्येकाच्या घरी मैद्यापासून पदार्थ बनवले जातात. त्यामुळे अशा परिस्थितीत मैदा वापरण्यापूर्वी त्याची चाचणी करणे आवश्यक आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने एका ट्विटमध्ये संगितले आहे की, मैदयामध्ये बोरिक एसिड मिसळले जाते. जे बोरिक ऑक्साईडचा कमकुवत अम्लीय हायड्रेटचा प्रकार आहे. त्यामुळे भेसळयुकत मैद्याचे पदार्थ खाल्याने कोणत्या समस्या निर्माण होतात तसेच हा मैदा कसा ओळखायचा ते जाणून घेऊयात.

बोरिक एसिड कसे काम करते?

बोरिक एसिडचा वापर या जंतूंना मारण्यासाठी केला जातो, जे चिकित्सक उत्पादनाच्या वस्तूंना नुकसान पोहचवतात. हे एन्टीसेप्टिक औषधांच्या वर्गाशी संबंधित आहे. या बोरिक एसिडचा वापर बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी केला जातो.

भेसळयुक्त मैदा खाल्ल्याने होणाऱ्या समस्या

यकृताच्या एंजाइममध्ये वाढ

पोटदुखी

विविध प्रकारच्या एलर्जी होणे

जळजळ होणे

केंद्रीय मज्जासंस्था (सीएनएस) व्यत्यय येणे

अतिसार, पुरळ, उलट्या होणे

मैदयातील भेसळ तपासण्यासाठी FSSAI ने सांगितल्या या टिप्स

एका ट्यूबमध्ये १ ग्रॅम पीठ घ्या.

त्यात ५ मिली पाणी घाला.

ट्यूबमध्ये असलेला मैदा आणि पाणी नीट मिक्स करा.

आता त्यात हायड्रोक्लोरिक एसिडचे काही थेंब टाका.

आता त्यात टर्मरिक पेपरची स्ट्रिप बुडवा.

जर मैदानामध्ये भेसळ असेल तर टर्मरिक पेपरचा रंग लाल होईल आणि भेसळ नसल्यास त्याच्या रंगात कोणताही बदल होणार नाही.

या टिप्सच्या मदतीने तुम्ही मैदयातील भेसळ सहज ओळखू शकता.

Story img Loader