साहित्य :
२ मध्यम आकाराचे कािरदे,
२-३ वाटी दूध, एक वाटी साखर, २-३ चमचे कण्डेन्स्ड मिल्क, थोडेसे तूप, बदाम-पिस्त्याचे काप.

कृती :
कािरद हे एक अतिशय पौष्टिक कंदमूळ आहे. हे साधारणत: बटाटय़ाच्या आकाराचे काळे खडबडीत पृष्ठभाग असलेले असते. हे कंदमूळ दिवाळीनंतर बाजारात मिळते. स्वच्छ धुतल्यावर शेंदरी पीचच्या रंगाचा कंद दिसेपर्यंत साल पूर्णपणे काढून घ्यावी. मग तो कंद किसून घ्यावा. थोडय़ाशा साजूक तुपावर कढईत भाजून घ्यावा. भाजताना रंग बदलणार नाही याची काळजी घ्यावी. भाजताना गोडसर वास सुटला की त्यात खीर किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ करायची असेल त्या प्रमाणात आटीव दूध घालावे, साखर घालावी. साधारण दोन बटाटय़ाइतक्या कािरद्यांना दोन ते तीन वाटी दूध आणि एक वाटी साखर लागते. गोडपणा बघून त्यात २ चमचे कण्डेन्स्ड मिल्क घालावे. हा कंद लवकर शिजतो. त्यामुळे ३-४ मिनिटांत खीर उकळल्यावर बंद करावी. वरून बदाम-पिस्त्याचे काप घालावेत. राजस गुलाबी शेंदरी रंगाची ही पौष्टिक रुचकर खीर गरम किंवा थंड कशीही सर्व केली तरी छान लागते.

केळफुलाची भजी

साहित्य :
१ केळफूल, १ वाटी बेसन, चिमूटभर हिंग, २ टी स्पून लाल तिखट, २ टी स्पून हळद, चिंचेचा पातळ कोळ १ मोठी वाटी, चिमूटभर सोडा, २ टी स्पून तांदळाची पिठी, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :
एक मोठा बाऊल भरून चिंचेचा कोळ करून ठेवावा. केळफूल साफ करण्यासाठी आधी हातांना तेल चोळून घ्यावे, ज्यायोगे हाताला चीक लागणार नाही. प्रत्येक पांढऱ्या फुलातून दोर काढून टाकावा. प्रत्येकाचा वरचा आणि खालचा भाग काढून टाकावा. प्रत्येक फूल काळजीपूर्वक साफ करून त्यातील नाजूक भागच वापरायचा आहे. अशा प्रकारे स्वच्छ केलेले भाग बारीक चिरून ते वर सांगितलेल्या चिंचेच्या कोळात सुमारे ५-६ तास ठेवावे. कारण केळफुलात प्रचंड प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते, हवेच्या संपर्कात ते काळे पडते. चिंचेच्या कोळाऐवजी आमसुलाचे पाणी किंवा आंबट ताकही वापरता येईल. भजी बनवताना आधी वर सांगितल्याप्रमाणे भिजलेल्या केळफुलातील चिंचेचे पाणी काढून टाकावे. त्यात वर दिलेले बाकीचे साहित्य घालून कालवावे. तापलेल्या गरम तेलात छोटी छोटी भजी सोडून खमंग कुरकुरीत सोनेरी रंगावर तळून घ्यावीत. पुदिना चटणी, सॉस, चिंचेची आंबट-गोड चटणी यापैकी कशाही बरोबर सव्‍‌र्ह करावीत.
अनुराधा पटवर्धन – response.lokprabha@expressindia.com