Food for brain : संपूर्ण शरिरावर मेंदूचे नियंत्रण असते. त्याला काही झाले तर आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अवयवांमध्ये ताळतंत्र राहणार नाही. त्यामुळे, त्याची काळजी घेण्याची गरज आहे. मेंदूला काम करण्यासाठी उर्जेची गरज असते, आणि ही उर्जा आहारातून मिळते.
क्रियाशील असणे, चांगल्याने काम करणे, तसेच लक्ष केंद्रित करता येणे आणि चांगली स्मरण शक्ती ही निरोगी मेंदूची लक्षणे आहेत. या कार्यांमध्ये बिघाड होणे म्हणजे मेंदू चांगल्याने काम करत नाहीये, असे मानले जाते. त्यामुळे, ही कार्ये सुरळीत होण्यासाठी मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेच आहे. दरम्यान आज आम्ही तुम्हाला काही खाद्य पदार्थांविषयी माहिती देणार आहोत जे मेदूला निरोगी राखण्यात फायदेशीर ठरू शकतात.
१) हिरव्या भाज्या
शरिराच्या विकासाबरोबरच मेंदूच्या विकासासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे गरजेच आहे. पालक, पत्ता कोबी, फूल कोबी, ब्रोकोलीसह अनेक हिरव्या भाज्या मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. या भाज्यांमध्ये मेंदूला गतिमान करणारे बीटा – कॅरोटीन, फोलिक अॅसिड, ल्युटिन आणि जीवनसत्व सहित अनेक पोषक तत्वे असतात. ते स्मरणशक्ती सुधारण्यात मदत करू शकतात.
(५० ते ८० वर्षे वय असेल्यांनी ‘या’ सवयी लगेच लावा, अनेक आजारांपासून राहाल सुरक्षित)
२) सुका मेवा
सुका मेवा प्रोटीन आणि फायबरचे मोठे स्त्रोत आहे. अक्रोड, बदाम, पिस्ताचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यात मदत होऊ शकते. सुका मेव्याने मेंदूला आवश्यक ते पोषक तत्व मिळतात. विशेषत: अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अँटिऑक्सिडेंट असतात जे मेंदूला कमकुवत होऊ देत नाही.
३) कॉफी आणि ब्लॅट टी
कॅफिनयुक्त चहा आणि कॉफी सारखे पेय मेंदूची माहिती प्रोसेस करण्याची क्षमता वाढवते. कॉफीमधील अँटिऑक्सिडेंट मेदूचे आरोग्य चांगले ठेवू शकते. त्याचबरोबर, ‘ग्रीन टी’चे सेवन देखील मेदूसाठी फायदेशीर ठरू शकते. ग्रीन टी मध्ये एल थिएनाइन असते. हे अमिनो अॅसिड चिंता आणि ताण दूर करण्यात मदत करू शकते. चिंता आणि ताण मुक्त मेदू चांगले काम करते. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ही प्येय घ्यावीत.
४) टमाटर
टमाटर हे मेंदूसाठी चांगले मानले जाते. टमाटरमध्ये भरपूर प्रमाणात लायकोपीन असते. लायकोपीन अल्जाइमर आणि पार्किन्सन्स सारखे स्मरणशक्तीशी संबंधित आजार दूर ठेवण्यात मदत करते.
(मुलांची उंची वाढवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश, फरक दिसून येईल)
५) मासे
साल्मन आणि टुना माशात भरपूर प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते. हे फॅटी अॅसिड मेंदूच्या आरोग्याबरोबरच शरिराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी देखील महत्वाचे आहे. माशातील हेल्दी फॅट ब्लडमधील बिटा एमिलॉइड कमी करते जे मेंदूमध्ये प्रोटिनचे गुच्छे बनवतात. याने पेशींचे कार्य बाधित होते, परिणामी पुढे अल्जाइमर होण्याचा धोका निर्माण होतो.
६) धान्यांचे सेवन
गहू, लापशी, आणि ब्राउन राइस संतुलित आहाराचा भाग आहे. त्यांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहाते असे मानले जाते. अनेक धान्यांमध्ये जीवनसत्व ई मोठ्या प्रमाणात असते. ते मेंदूसाठी महत्वाचे अँटिऑक्सिडेंट आहे. जीवनसत्व ई चेतासंस्थेला होणारी इजा थांबवण्यात मदत करते.
७) अंडे
अंड्यातून केवळ प्रोटिनच नव्हे तर, जीवनसत्व, ब ६, ब १२ आणि ब ९ मिळते. हे जीवनसत्व मेंदू कमकुवत होणे आणि वृद्ध लोकांमधील मेदूचे आजार टाळण्यास मदत करत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे, निरोगी मेंदूसाठी तुम्ही अंड्यांचे सेवन करू शकता.
८) हळद
हळदीतील कुरक्युमिन नावाचे घटक मेदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हे घटक मेदूतील पेशींचा विकास होण्यात मदत करते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)