आजकाल मुले मैदानी खेळ खेळण्याऐवजी मोबाइल, संगणक आणि लॅपटॉपवर गेम खेळणे पसंत करत आहेत. यामुळे त्यांचा स्क्रिन टाईम वाढला आहे. ही उपकरणे अधिक काळ वापरत असल्याने मुलांची दृष्टी कमजोर होत आहे. मात्र, मुलांच्या आहारामध्ये काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करून त्यांची दृष्टी चांगली होऊ शकते. या पदार्थांबाबत आपण जाणून घेऊया.
१) मासे
माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर समजल्या जाते. मुलांच्या आहारात माशांचा समावेश करा. त्यांच्या सेवनाने डोळ्यांचे स्नायू बळकट होतात आणि दृष्टीही वाढू शकते. जर मुलांना मासे आवडत नेसल तर तुम्ही त्यांना फिश ऑइल पिल्स देऊ शकता.
२) अंडे
अंड्यापासून भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. तसेच, अंड्यामध्ये ल्युटिन नावाचे अँटिऑक्सिडेंट आढळते जे डोळ्यांची दृष्टी कमी होण्याचे टाळते. दृष्टी वाढवण्यासाठी मुलांच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश केला पाहिजे.
Diwali gold purchase : दिवाळीत सोने खरेदी करताय? खरे की खोटे असे ओळखा
३) जीवनसत्व – क
जीवनसत्व – क डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. ते मिळवण्यासाठी लिंबू, टमाटर, संत्र्याचे सेवन करावे. जीवनसत्व क युक्त पदार्थ डोळ्यांची दृष्टी वाढवण्यात मदत करू शकतात.
४) डाळ
डाळींमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते, जे मुलांच्या डोळ्यांची दृष्टी वाढवण्यात मदत करते. मुलांच्या आहारामध्ये काळी डाळ आणि राजम्याचा समावेश करा. त्याचबरोबर, तुम्ही मुलांना काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड खायला द्या. या सुक्या मेव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ई असते, जे दृष्टी चांगली करण्यात मदत करते.
५) चिया सिड
मुलांना चिया सिड्स खायला द्या. चिया सिड्सने देखील डोळ्यांसंबंधी समस्या दूर होऊ शकतात.
(मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जळजळ वाटते?, ‘या’ पदार्थांचे करा सेवन, आराम मिळेल)
६) हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. हिरव्या भाज्यांमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व आणि खनिज पदार्थ आढळतात, जे शरिरासाठी फायद्याचे ठरतात. तुम्ही मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. त्यांच्या सेवनाने डोळ्यांची दृष्टी चांगली होऊ शकते. डोळे निरोगी राहण्यासाठी तुम्ही मुलांच्या आहारामध्ये केळी, पालक आणि ब्रोकोलीचाही समावेश करू शकता.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)