Uric Acid Remedies: डॉ. अमरेंद्र कुमार यांच्या माहितीनुसार, युरिक ऍसिड हे मुख्यतः किडनीच्या मार्फत फिल्टर होऊन मलमूत्रातून बाहेर पडते पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिड शरीरात छोट्या खड्यांसारखे जमा होते. युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते, इतकेच नव्हे तर अनेकांना उठताना, बसताना, चालताना सुद्धा सांधेदुखी जाणवते. थंडीत विशेषतः जेव्हा तापमान कमी होते तेव्हा सांध्यांमधील ल्युब्रिकेशन कमी होऊन हालचाल करणे कठीण होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युरिक ऍसिडचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आहारात प्युरीन युक्त पदार्थ वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच आहारात अधिकाधिक फायबरचा समावेश करणे हिताचे मानले जाते. शरीरात प्युरीनचे प्रमाण कमी करण्यासाठी आज आपण नियमित आहार कसा असावा याविषयी माहिती घेणार आहोत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आहारात ३ प्रकारच्या धान्याचा समावेश हा युरिक ऍसिडचा स्तर कमी करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. ही धान्य कोणती व त्यांचे फायदे जाणून घेऊयात…

युरिक ऍसिडवर रामबाण उपाय ठरतात ही ३ धान्य

ज्वारी

युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्वारीचे सेवन गुणकारी मानले जाते. ज्वारीमध्ये हेल्दी फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन व मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात याचा फायदा शरीरातील प्युरीनचे प्रमाण कमी करण्यास होऊ शकतो. यामुळेच ज्वारीची भाकरी, ज्वारीच्या पिठाचं थालिपीठं, याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. थंडीच्या दिवसात ज्वारीचे सेवन शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासही उपयुक्त ठरते.

तांदूळ

वाचून आश्चर्य वाटलं ना? अर्थात. मधुमेह, रक्तदाब अशा गंभीर आजारात रुग्णांना भाताचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो मात्र तज्ज्ञांचं माहितीनुसार तांदूळ हे असे धान्य आहे ज्यात प्युरीनचे प्रमाण कमी असते. यामुळे युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी भाताचे सेवन हिताचे ठरू शकते. तांदळात कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी यांचे प्रमाण अधिक असते. फायबरयुक्त तांदळाच्या सेवनाने पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते, यामुळे मलमूत्र संबंधित तक्रारींवरही समाधान मिळवता येऊ शकते.

मुगाची डाळ

युरिक ऍसिडचे प्रमाण अधिक असलेल्या व्यक्तींनी मूगडाळीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. वर म्हंटल्याप्रमाणे थंडीच्या दिवसात सांध्यांमधील ल्युब्रिकेशन कमी होते अशावेळी मुगाच्या डाळीतील सत्व शरीरातील सांध्यांची लवचिकता वाढवण्याचे काम करतात. मूगडाळीत तुलनेने प्युरीनचे प्रमाण अधिक असले तरी यामुळे युरिक ऍसिडवर थेट परिणाम होत नाही. उलट मूगडाळीमुळे पचनप्रक्रिया जलद होऊन बद्धकोष्ठ, गॅसच्या समस्यांवर आराम मिळतो. परिणामी मलमूत्रातून युरिक ऍसिड शरीरतून बाहेर पडून स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरू शकते.

संध्याकाळी ६ पासून ऍसिडिटी सर्वाधिक का जाणवते? ‘हे’ ४ आयुर्वेदिक पदार्थ ठरतात रामबाण उपाय

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food that lower uric acid home remedies for swollen legs fingers constipation gas winter tips svs