Bloating Problem: सध्याच्या काळातील चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना पोट फुगण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोट फुगण्याची समस्या असते तेव्हा गॅस तयार होणे, पोट दुखणे, अस्वस्थ वाटणे इत्यादी लक्षणे दिसतात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अशा वेळी माणसाने थोडी काळजी घेतली तर या समस्येवर लवकर मात करता येते. आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या आणखी वाढू शकते. त्या गोष्टींबद्दल जाणून घ्या
या पदार्थांपासून दूर रहा
- ब्रोकोली– जर तुम्हाला फुगण्याची समस्या असेल तर ब्रोकोलीचे सेवन करू नका. पोटाला ब्रोकोली पचण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या आणखी वाढू शकते.
- सफरचंद– जर एखाद्याला पोट फुगण्याची समस्या असेल तर सफरचंदाचा आहारात समावेश करू नका. कारण सफरचंद फायबरचा समृद्ध स्रोत आहे, ज्यामुळे केवळ गॅसची समस्याच नाही तर ब्लोटिंगची समस्या आणि वेदना देखील होऊ शकतात.
- लसूण– लसूण पोट फुगण्याची समस्या देखील वाढवू शकतो. यामध्ये फ्रक्टन्स आढळतात, ज्यामुळे ब्लॉटिंगची समस्या आणखी वाढू शकते.
- बीन्स– बीन्सच्या सेवनाने पोट फुगण्याची समस्या वाढू शकते. अशा स्थितीत पोट फुगण्याची समस्या असली तर व्यक्तीने याचे सेवन करू नये. बीन्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे केवळ डायरियाची समस्याच उद्भवत नाही तर पोट फुगणे आणि पोटदुखीच्या समस्येला देखील सामोरे जाऊ शकते.
First published on: 02-04-2022 at 00:37 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food to avoid during bloating problem broccoli apple garlic beans for instant relief prp