धावपळ आणि कामाच्या ताणामुळे लोकांची जीवनशैली बदलत चालली आहे. तसेच खाण्यापिण्यामध्येही फरक पडला आहे. पौष्टिक पदार्थ सोडून जंक फूडकडे लोक वळत चालले आहे. चुकीची आहार पद्धत आणि इतर सवयींमुळे मग शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या वाढते. ही समस्या कमी होऊ शकते. यासाठी शुक्राणूंची संख्या कमी होण्याची कारणे काय आहे ते जाणून घ्यावे लागेल. तसेच योग्य आहार घ्यावा लागेल.
या कारणांमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते
१) धुम्रपान करणे
२) आहारात जंक फूडचा समावेश करणे
३) शरीरात ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे देखील कमी होतात शुक्राणू
४) घट्ट अंतर्वस्त्रामुळे
५) मद्याच्या सेवनामुळे
६) चरबी वाढवणारे पदार्थ खालल्यामुळे
(राजू श्रीवास्तव यांची झाली व्हर्च्युअल ऑटोप्सी, काय असते ते? जाणून घ्या..)
शुक्राणू वाढवण्यासाठी काय ?
१) शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी अंड्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. अंड्यापासून जीवनसत्व ई, झिंक आणि प्रथिने मिळतात जे शुक्राणूंची संख्या वाढवण्यात मदत करतात.
२) सफरचंद खालल्याने शुक्रणांची संख्या वाढू शकते. एका सफरचंदाचे सेवन केल्याने देखील शुक्राणूंच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते. सफरचंदामध्ये अँटिऑक्सिडेंट हा घटक आढळतो जे प्रजनन क्षमता वाढवण्यात मदत करतात.
(१२ आठवड्यांत कमी होऊ शकते ६ किलो वजन, केवळ ‘हे’ नियम पाळावे लागतील)
३) टोमॅटो हे पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट घटक असतात. टोमॅटो कोशिंबीर किंवा भाजी म्हणून सेवन करता येते.
४) लसून देखील आरोग्यासाठी उपयुक्त आहे. लसूण शुक्राणूंची संख्या वाढवण्यात मदत करू शकते. लसणात जीवनसत्व ब ६ आढळते जे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)