प्रत्येक स्वयंपाकघरात जर तुम्ही डोकावल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला हमखास दिसेल…ती म्हणजे लोखंडी कढई. काळ्या रंगाचे हे भांडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला वारसा म्हणून हस्तांतरित केले जाते. अजूनही लोंखडी कढईमध्ये कित्येक खाद्यपदार्थ तयार केले जातात. आजच्या काळात नवीन स्वरुपाची विविध भांडी कितीही मिळत असली तरी पारंपारिक पद्धतीने लोखंडी कढईत जेवण तयार करण्याची प्रथा अजूनही आपल जपली आहे. असे मानतात की, लोखंडी कढईत अन्न शिजवणे आरोग्यदायी आहे ते तुमच्या आहारात पौषणमुल्य निर्माण करतात आणि जेवनाची चव वाढवितात पण हे सर्वच बाबतीत लागू होते असे नाही. कारण असे काही पदार्थ आहे जे लोखंडी कढईत कधीही शिजवू नये कारण त्या पदार्थांसह रासायनिक प्रक्रिया होऊन तुमच्या जेवणाची संपूर्ण चव बिघडून जाईल आणि तुम्हाला हवा तसा पदार्थ होणार नाही. पण आपण लोखंडी कढईत स्वयंपाक करणे टाळले पाहिजे त्या पदार्थांवर एक नजर टाकण्यापूर्वी आपण लोखंडी कढई आणि कास्ट आयर्न कढई यातील फरक समजून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोखंडी कढाई किंवा कास्ट आयर्न कढई यांच्यातील मुख्य फरक काय आहे?

लोखंडी आणि कास्ट आयर्न कढई मधील मुख्य फरक म्हणजे ते कोणत्या प्रकारच्या सामग्रीपासून तयार केले जातात यावरून स्पष्ट होतो. लोखंडाची कढई लोह म्हणजेच आर्यनपासून बनविली जाते, तर लोह, कार्बन आणि सिलिकॉनच्या मिश्रणापासून कास्ट आयर्न कढई तयार केली जाते जाते. कास्ट आयर्न कढईमध्ये देखील लोखंडी कढईपेक्षा जास्त उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता असते.

लोखंडी कढईमध्ये हे ५ पदार्थ तयार करणे टाळा


१. टोमॅटो


टोमॅटो हा प्रत्येक भारतीय पदार्थातील मुख्य घटक आहे. भाजी करिता वाटण तयार करणासाठी किंवा फोडणी देण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. पण मुळात टोमॅटो नैसर्गितरित्या आम्लयुक्त पदार्थ आहे. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊ शकते आणि धातूची अन्नामध्ये गळती होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवनाची चव खराब होईल . तसेच लिंबू आणि व्हिनेगर सारखे आम्लयुक्त पदार्थ देखील लोंखडी कढईमध्ये तयार करणे टाळा.

हेही वाचा : IRCTC ने आणले भन्नाट टूर पॅकेज! उन्हाळ्यात शिमला-कुल्लू-मनाली फिरण्याची संधी

2.अंडी

तुम्ही नेहमी जर अंडी करण्यासाठी लोंखडी कढई वापरत असाल तर तुम्ही हे आता थांबवले पाहिजे. अंड्यामध्ये असलेले स्ल्फरची कढईच्या लोहसोबत प्रक्रिया होऊ शकते आणि त्यामुळे अंड राखाडी होऊ शकते आणि त्याची चव बदलू शकते. एवढचं नव्हे तर लोह आणि सल्फरची प्रक्रिया झाल्यास लोंखडी कढईला गंज लागू शकतो, तिचा रंग उतरू शकतो आणि ती दिर्घकाळापर्यंत टीकू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही नॉन-स्टिकची भांडी अंड्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरली पाहिजे.

हेही वाचा : IRCTC ने आणले भन्नाट टूर पॅकेज! उन्हाळ्यात शिमला-कुल्लू-मनाली फिरण्याची संधी

3. मासे


लोखंडी कढईत मासे देखील तयार करणे टाळले पाहिजे कारण माशांमध्ये अॅसिड असते ज्याची लोहासोबत प्रक्रिया होऊ शकते आणि त्यामुळे कढईच्या तळाशी चिकडू शकते आणि माशांचे चव पूर्णपणे बदलू शकते. जर तुम्ही मासे बनवण्याच विचार करत असाल तर तुम्ही स्टेनलेस स्टील किंवा नॉन स्टीक पॅन सारखे प्रक्रिया न होणारी भांडी वापरा.

4.भात

तुम्ही लोंखडी कढईमध्ये भात बनवता का? करत असाल तर आम्ही ते ताबडतोब थांबविण्याचा सल्ला देऊ . याचे कारण असे आहे की, तांदूळातील उच्च आंबटपणा, ज्याची लोहावर प्रतिक्रिया होऊ शकतो, ज्यामुळे भाताचे रंग बदलतो आणि त्याला पूर्ण धातूची चव येते. लोह तांदळात असलेल्या नैसर्गिक तेलांवर देखील प्रक्रिया करू शकते, ज्यामुळे ते पॅनच्या तळाशी चिकटते. म्हणून, भात शिजवताना लोखंडी कढई वापरणे टाळणे आणि स्टेनलेस स्टील किंवा इतर नॉन-स्टिक कुकवेअरने तयार केलेले जड-तळाचे भांडे निवडणे चांगले.

हेही वाचा : Dating Tips: लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये आहात? नात्यात प्रेम निर्माण करण्याचे ‘हे’ आहेत ५ प्रभावी मार्ग

५. पास्ता

तुम्हाला माहित आहे का, पास्ता लोंखडी कढईमध्ये तयार करणे हे आरोग्यदायी नाही, विशेषत: जेव्हा तुम्ही तो टोमॅटोचा सॉस घालून पास्ता तयार करू शकता. कारण टोमॅटोमध्ये आम्लयूक्त घटकांची लोहासोबत प्रक्रिया होऊ शकते जे चांगले नाही. तसेच लोखंडी कढी जास्त काळ उष्णता पकडून ठेवते ज्यामुळे पास्त जास्त शिजवला जाऊ शकतो किंवा तळाला चिकटू शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foods you should avoid cooking in an iron kadhai snk
Show comments