नव्याने संशोधन करण्यात आलेल्या मलेरियावरील औषधाचे मानवी शरीरावरील पहिल्यावहिल्या परीक्षणाचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून यामुळे शर१रातील रोगप्रतिकारक पेशींमध्ये झपाटय़ाने वाढ होताना रक्तामधील परोपजीवी जंताचे प्रमाण केवळ ५९ टक्के असल्याचे दिसून आले आहे.
निद्रिस्त स्वरूपाच्या आणि कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या ‘प्लासोमोडियम व्हिवाक्स’सारख्या मलेरियावर नियंत्रण मिळवणे हे अतिशय कठीण असते. मात्र आठवडा ते महिन्याभराच्या प्रारंभिक संसर्गानंतर दिसणारी लक्षणे ही मलेरिया सक्रिय झाल्याचे निर्देशित करते.
मलेरियापासून बचाव करण्यासाठी पहिल्यांदाच ‘व्हिवाक्स’ या औषधाचे मानवावर संशोधन केले गेले असून नव संशोधनाच्या अन्वेषणाने अमेरिकेच्या अन्न आणि औषधे प्रशासनाच्या देखरेखीखाली वॉल्टर रिड इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्चमधील(डब्लूआरएआयआर)संशोधक व ग्लास्को स्मित किल्ने(जीएसके)यांच्या संयुक्त परीक्षणातून केले गेले आहे.
संशोधकांनी ३० जणांवर या औषधांचे लसीकरण तीन वेळा केले. त्यानंतर डब्लूआरएआयआरकडून मानवावर मलेरियाच्या होणाऱ्या संसर्गावरील(सीएचएमआय) कार्यक्रमात या स्वयंसेवकांना सहभागी करताना मलेरियाबाधित मच्छरांकडून दंशदेखील करण्यात आले. या वेळी लसीकरण झालेल्या स्वंयसेवकांवर लसीकरणाचा प्रभाव निर्धारित आधारांवर झाला की नाही किंवा त्यांच्या रक्तात मलेरियाच्या अंशाचा प्रभाव किंवा मलेरियाच्या परजीवींचा रक्तातील प्रसारासाठी निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधी लागल्याचे दिसून आले.
या संशोधनातील प्रमुख अभ्यासक जेसन बेनेट यांच्या म्हणण्यानुसार, ‘पी-व्हिवाक्स’ या औषधामुळे मानवी शरीरावरील मलेरियाचा संसर्ग रोखण्यात यश मिळाल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या वेळी अन्य स्वंयसेवकांपेक्षाही लसीकरण केलेल्या स्वयंसेवकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले तसेच त्यांच्यात मलेरियाच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे न आढळता, रक्तातील परजीवीचे प्रमाण केवळ ५९ टक्के असल्याचे दिसून आले.
‘डब्ल्यूआरएआयआर’अंतर्गत मलेरियावरील संशोधनाचे अमेरिकन लष्कराचे प्रमुख रॉर्बट पॅरिस यांच्या मतानुसार, यामुळे भविष्यात सुधारित औषधांची निर्मिती शक्य आहे. कारण अशा प्रकारच्या नवसंशोधनातूनच सुधारित औषधांच्या निर्मितीबाबतचे नवनवीन संकेत मिळत असतात शिवाय सुरू असलेल्या नवसंशोधनातूनच पुढील पिढीसाठीच्या सुधारित ‘व्हिवाक्स’ औषधांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा