मक्याबद्दल काही लोकांमध्ये अनेक पूर्वग्रह आणि कमालीचे गैरसमज आहेत. परिणामी काही लोक या चांगल्या पौष्टीक अन्नापासून वंचीत आहेत. खर काय ते समोर आलेच पाहीजे. हफिंग्टन पोस्ट डॉटकॉम या संकेतस्थळावारील एका अहवालानुसार लोकांमध्ये मक्याबद्दल अनेक गैरसमज आहेत.
गैरसमज काय
मका पौष्टीक नाही – असे मुळीच नाही. मक्यामध्ये अनेक पौष्टीक घटक आहेत. त्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने ते पौष्टीक नसल्याचा चुकीचा समज लोकांमध्ये आहे.
मका पचायला जड आहे- मक्यामध्ये विघटन न होणाऱ्या फायबरचे प्रमाण जास्त आहे हे खरे असले तरी ती काही वाईट बाब नाही. शरिरातील चांगल्या बॅक्टेरियाच्या पोषणासाठी हे सहज विघटन न होणारे फायबर उपायकारक आहे.
मका हा चांगल्या पोषक द्रव्यांचा स्त्रोत नाही- मक्यामध्ये काही प्रमाणामध्ये ब आणि क जीवनसत्व, तसेच मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण आहे. पिवळी मका ही डोळ्यांसाठी उपकारक अशा अन्टीऑक्सीडंट चा मोठा स्त्रोत आहे.
मका खाऊ नका कारण यात साखरेचे प्रमाण जास्त आहे- साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्ही केळी खाण्याचे थांबवता का? मग मक्याला वेगळा न्याय कशासाठी? एका मक्याच्या कणसामध्ये केवळ ६ ते ८ ग्रॅम साखर असते, तर एका केळीमध्ये हेच प्रमाण १५ ग्रॅम आहे.
मक्याबद्दलचे गैरसमज दुर होण्यासाठी एवढ्या बाबी पुरेशा आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा