नवरा-बायकोचे, प्रियकर आणि प्रेयसी यांचे नाते हे प्रेमासोबत, विश्वास आणि त्यांच्यातील खरेपणावर टिकून असते. मैत्री, विश्वास किंवा प्रेम यापैकी कोणतीही एक गोष्ट जर त्या नात्यामधून नाहीशी झाली तर त्या दोन व्यक्तींमध्ये भांडणं, अबोला येऊन त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. दोन व्यक्तींमध्ये सतत भांडणं होत असतील, एकमेकांचे वारंवार मतभेद होत असतील तर त्याला अनेक करणे असू शकतात. मात्र त्यापैकी एक कारण असू शकते ते म्हणजे, अनहेल्दी रिलेशनशिप.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


आपण एका अनहेल्दी नात्यामध्ये आहोत हे ओळखण्यासाठी या चार टिप्स तुमची मदत करू शकतात. असे एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते.

१. दुर्लक्ष करणे

एक चांगला जोडीदार आपल्या सर्व गोष्टी, प्रश्न काहीही न बोलता ऐकून घेतो, त्यावर चर्चा करतो. मात्र, जर तुम्ही एखादी गोष्ट आपल्या जोडीदाराला सांगण्याचा प्रयत्न असाल; किंवा एखादी गोष्ट, प्रश्न विचारात असल्यास, त्याबद्दल चर्चा न करणे, तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे हे एका अनहेल्दी नात्यांचे एक लक्षण असू शकते.

हेही वाचा : Beauty tips : ‘या’ दहा सवयी घेतील तुमच्या त्वचेची योग्य काळजी; पाहा चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणाऱ्या सोप्या टिप्स

२. उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करणे

तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखादा प्रश्न केल्यावर, जर तो विनाकारण हसून, भलत्याच गोष्टींबद्दल बोलून तो विषय टाळत असले, विषय बदलत असेल; तर हादेखील एक संकेत आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे खरे उत्तर तुमच्या जोडीदाराने देणे अपेक्षित असते. मात्र तो तसे करत नसल्यास ते एक पारदर्शक नाते नसते, असे समजावे.

३. तुमच्याकडे लक्ष न देणे

आपला जोडीदार आपल्याला काहीही न सांगता किंवा आपल्याबद्दल कोणताही विचार न करता काही गोष्टी करत असेल; आणि त्याबद्दल विचारल्यानंतर प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळत असेल तर ते नाते अनहेल्दी असू शकते.

४. एकमेकांचा आदर न करणे

प्रत्येक जोडप्यामध्ये भांडणं, वाद-विवाद हे होत असतात. मात्र त्यामध्ये जर एकमेकांना वाट्टेल तसे बोलले जात असेल, चारचौघात अपमान केला जात असेल तर, त्या नात्यामध्ये आदर नसल्याचे हे लक्षण म्हंटले जाऊ शकते. अशा भांडणांचा त्रास, परिणाम दोन्ही व्यक्तींवर होत असतो. अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : रस्त्यावरच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून कुत्रादेखील कमावतोय पैसे! पाहा, व्हायरल व्हिडीओवर काय म्हणाले नेटकरी…

कोणत्याही नात्यात जोडीदाराचा अनादर करणे हे चुकीचे आहे. एकमेकांमधील मतभेत टाळून, जोडीदाराशी शांतपणे बोलून, एकमेकांना समजून घेणे महत्वाचे असते. त्यामुळे मनात कुठलाही प्रश्न असल्यास थंड डोक्याने आणि शांतपणे आपल्या जोडीदाराशी बोलून प्रश्न सोडवावे.

[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four tips to detect an unhealthy relationship note down these simple and useful tips and tricks dha
Show comments