नाश्त्यामध्ये अंडी खाणे किंवा अंड्याचे ऑम्लेट खाणे हा आपल्यातील कित्येकांच्या आयुष्याचा भाग झाला आहे. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो, हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. या पोषतत्वांसोबतच अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, लोह आणि जीवनसत्वांचा समावेश आढळून येतो. प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून अंड्याकडे पाहिले जाते. अनेक फायदे असणाऱ्या अंड्यांचा काहीजण नियमित आहारात समावेश करतात. अंड्याची करी बनवण्यासाठी तर काही घरात नाश्त्यामध्ये उकडलेल्या अंड्यांचा समावेश दररोज केला जातो. अशावेळी आपण ते पाण्यात टाकून थोडा वेळ उकडतो. पण अनेक वेळा असे घडते की अंडी उकडण्यासाठी पाण्यात टाकताच ते फुटतात, खराब होतात. अशी समस्या अनेकांसाठी त्रासाचे कारण बनते. पण काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही अंडी उकडत असताना फुटण्यापासून किंवा खराब होण्यापासून वाचवू शकता. जाणून घेऊयात, उपाय…

अंडी उकडताना फुटू नयेत, यासाठी करा खालील सोपे उपाय

१. फ्रीजमधून अंडी बाहेर काढा

फ्रीजमध्ये अंडी ठेवणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु जर तुम्ही ते थेट फ्रीजमधील अंडी पाण्यात उकळण्यासाठी ठेवले तर ते नक्कीच फुटतील. त्यामुळे अंडी उकडण्याआधी ती फ्रीजमधून बाहेर काढा आणि नॉर्मल तापमानावर येऊ द्या, (१० ते १५ मिनिटे बाहेर ठेवावी) मगच ती पाण्यात टाकून उकडण्यास ठेवा. तसेच अंडी उकडताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा, यामुळे अंडी फुटणार नाहीत आणि व्यवस्थित शिजतील.

Gas Stove Safety Tips Everyone In Your Family Should Know Tips While Looking After Domestic Gas
Safety Tips: घरगुती गॅसची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या आवश्यक टिप्स
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
Which finger should you get a glucometer test done on?
तुम्हालाही डायबिटीज आहे का? मग टेस्ट करताना कोणत्या बोटावर करायची? जाणून घ्या
Doctor Answered On what basis your left or right arm is chosen for blood donation
रक्तदानासाठी तुमचा डावा किंवा उजवा निवडावा हे कोणत्या आधारावर ठरवले जाते? तज्ज्ञांनी केला खुलासा

२. मोठ्या भांड्यांचा वापर करा

जरी तुम्हाला दोन अंडी उकळायची असतील तरी त्यासाठी मोठ्या आकाराचे भांडे निवडा. असे केल्याने, अंडी उकळताना एकमेकांवर आदळणार नाहीत आणि ती फुटण्यापासून वाचतील. गॅस वाचवण्यासाठी किंवा अंडी लवकर उकळण्यासाठी लोक लहान आकाराची भांडी वापरतात. अशा परिस्थितीत ते फुटण्याची शक्यता जास्त असते.

(हे ही वाचा : Jugaad Video: गरम तव्यावर कंगवा फिरवताच झाली कमाल! परिणाम पाहाल तर थक्क व्हाल )

३. पाण्यात मीठ टाका

ज्या पाण्यात आपण अंडी उकडतो त्या पाण्यात मीठ मिसळले पाहिजे हे फार कमी लोकांना माहिती आहे. वास्तविक, मीठ घालणे खूप उपयुक्त ठरू शकते. मिठाच्या पाण्यात अंडी उकडल्याने यामुळे उकडल्यानंतर अंड्याचे साल सहज निघेल. अनेक वेळा लोकांना अंडी उकडल्यानंतर नीट सोलता येत नाही. हे टाळण्यासाठी अंड्याच्या पाण्यात मीठ घालून पाहा.

४. व्हिनेगर लावा

अंडी उकडताना ती पाण्यात पूर्ण पणे बुडतील याची काळजी घ्या. अंडे उकडताना टिचले तर त्याच्या सालीवर व्हिनेगर लावा. यामुळे अंडे पूर्णपणे तुटणार नाही. दहा मिनिट अंडी उकडली की त्यानंतर गॅस बंद करा आणि पुन्हा पाणी थंड होईपर्यंत अंडी पाण्यातच ठेवा.

अशाप्रकारे उपाय करुन अंडी उकडण्याच्या या समस्येवर मात करता येऊ शकते.