Ghee For Weight Loss: तूप हा भारतीय घरांमध्ये आढळणारा एक कॉमन पदार्थ आहे. विकत आणलेले असो किंवा घरी साय साठवून तयार केलेले तुप असो पण प्रत्येक घरात एक तरी तुपाचा डबा असतोच. तूप हा एक त्यांत ट्रिकी पदार्थ म्हणता येईल, याचं कारण म्हणजे स्निग्ध पदार्थ हे अधिक कॅलरीयुक्त असल्याचे मानले जाते. यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो असाही अनेकांचा समज असतो. शिवाय हृदय सुरक्षित ठेवायचं असेल, कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर या स्निग्ध पदार्थांपासून दूरच राहा असे सल्ले दिले जातात. पण तूप हे सगळ्या समाजांना छेद देते. तुपाचे सेवन वजन कमी करण्याचा वेग वाढवण्यासाठी सुद्धा ओळखले जाते. पण यासाठी तूप खायचं कसं हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण चार अशा पद्धती पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वेटलॉस प्रक्रियेत तुपाचा समावेश करता येऊ शकेल.

वजन कमी करण्यासाठी तूप खाण्याचे चार प्रकार

१) कॉफी + तूप

तूप मिसळून बनवलेली कॉफी ही बुलेटप्रूफ कॉफी म्हणून ओळखली जाते. तूप पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी ओळखले जाते तसेच यामुळे करपट ढेकर, बद्धकोष्ठता अशा त्रासांपासून सुटका मिळू शकते. पचनाचा वेग वाढून मलमूत्रातून कॅलरी व शरीरातील घातक घटक बाहेर पडू शकतात. यामुळे शरीरात साठवून ठेवली चरबी कमी होते आणि याचा प्रभाव वजनावर दिसून येऊ शकतो.

varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Madhukar Pichad
Madhukar Pichad : भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन; ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…

२) तूप पोळी

तुपामुळे पाचक एन्झाइम्स आतड्यांमध्ये सोडले जातात ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे त्रास दूर होण्यास मदत होते.पोळीमध्ये (गव्हाच्या) असणाऱ्या फायबरला तुपाची जोड मिळाल्याने पचनप्रक्रियेला हातभार लागतो.

३) दूध व तूप

कोमट दुधाच्या ग्लासमध्ये एक चमचा तूप टाकल्याने पचन आणि चयापचय सुधारण्यास मदत होते, दूध आणि तुपातील एन्झाईम्स पोषक तत्वांचे चांगल्या प्रकारे शोषण करण्यासाठी व अन्न पचण्यासाठी मदत करतात. इतकेच काय, तूप अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्यात सुद्धा मदत करते.

हे ही वाचा<< फक्कड गुळाचा चहा करताना दूध फाटू नये म्हणून करा ‘हे’ सोपे उपाय; चव खराब होणार नाहीच, पैसेही वाचतील

४) कोमट पाणी व तूप

सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यासारख्या शौचाशी संबंधित समस्या दूर होण्यास सुद्धा मदत होते.तुपाचे सेवन केल्याने भूक शांत होते आणि वजन नियंत्रणात राहते.तुपातील ओमेगा ३ फॅटी ऍसिडमुळे शरीरातील घातक फॅट्स बाहेर पडून वजन कमी होण्यास मदत होते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Story img Loader