Free Aadhaar update: आधार कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असल्यास किंवा त्यावरील पत्ता, फोन नंबर किंवा इतर कोणतीही माहिती अपडेट केली नसेल तर हीच वेळ आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सध्या आधारसाठी मोफत ऑनलाइन अपडेट देत आहे, परंतु त्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर आहे. याचा अर्थ तुमचा आधार मोफत अपडेट करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. अंतिम मुदतीनंतर तुम्हाला आधार कार्डवरील तुमची माहिती अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

UIDAI ने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की, तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील माहिती मोफत अपडेट करू शकता. यापूर्वी ही सुविधा १४ मार्चपर्यंत होती, त्यानंतर १४ जूनपर्यंत वाढवली, नंतर पुन्हा सप्टेंबरपर्यंत आणि आता १४ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुदतीनंतर जर तुम्हाला आधार अपडेट करायचे असल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कदाचित सरकार यानंतर कोणतीही मुदत वाढ देणार नाही.

आधार कार्डवरील कोणत्या गोष्टी अपडेट करता येणार?

या मोफत सेवेत फक्त आधार कार्डवरील तुमचा पत्ता, फोन नंबर, नाव इत्यादी गोष्टी अपडेट करता येतात. तुम्हाला तुमच्या बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅनसारखी माहिती बदलायची असल्यास, तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. तुम्ही काय अपडेट करू शकता आणि ते कशापद्धतीने अपडेट करायचे याची प्रोसेस जाणून घेऊ…

आधार अपडेट करणे महत्त्वाचे का आहे?

आधार हा भारत सरकारने दिलेला १२ अंकी क्रमांक आहे. सरकारी योजनांमध्ये सामील होणे, कर भरणे, तिकीट बुक करणे आणि बँक खाती उघडणे अशा अनेक कारणांसाठी याचा वापर केला जातो. पण, यासाठी तुमची माहिती बरोबर असली पाहिजे.

कोणत्या गोष्टी अपडेट करणे आवश्यक आहे?

१) जर तुमचे आधार कार्ड १० वर्षांपेक्षा जुने असेल तर तुम्ही ते अपडेट करावे.

२) जर तुमचे मूल १५ वर्षांचे असेल तर तुम्ही त्याचे आधार कार्ड अपडेट करावे.

३) तुमचे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन बदलले असले तरी तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करावे.

४) जर तुमच्या आधार कार्डमध्ये वारंवार समस्या येत असतील तर तुम्ही ते अपडेट करावे.

हेही वाचा – Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी

आधार कार्ड अपडेट कसे करायचे? (How to update Aadhaar card details Free 2024 process)

१. प्रथम UIDAI वेबसाइटला भेट द्या: myaadhaar.uidai.gov.in
२. तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि नंतर तुमच्या फोनवरील OTP सह व्हेरिफाय करा.
३. स्क्रीनवर दिसणारी माहिती तपासा, जसे की नाव आणि पत्ता. काही चुकीचे असल्यास ते बदला.
४. नंतर माहिती बरोबर असल्याच्या ओळखपत्राचा पुरावा द्या. यासाठी तुम्हाला एक अधिकृत ओळखपत्र द्यावे लागेल, जे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावे लागेल (2MB पेक्षा कमी आकाराचा).
५. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही अपडेटची स्थिती तपासू शकता.

Story img Loader