बटाट्याचे तळलेले काप म्हणजेच फ्रेंच फ्राईज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ले जातात. पण, फ्रेंच फ्राइज आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसतात असे काही आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, प्रत्यक्षात ते आरोग्यवर्धक आहेत. योग्यप्रकारे फ्रेंच फ्राईज तळल्यास ते अतिशय पोषक ठरू शकतात, असा दावा काही इटालियन संशोधकांनी केला आहे. फ्रेंच फ्राईज बटाट्यापासून बनविण्यात येतात. तळल्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले नसतात, असे आहारतज्ज्ञ सागंतात. कारण तेल आणि बटाट्यामुळे शरिरातील चरबी आणि कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो.
इटालियन शेफ जिउसेप्पे डॅडिओ यांनी दाखविलेल्या तळण्याच्या प्रयोगांमध्ये काही आश्चर्यकारक गोष्टी आढळून आल्या. आरोग्यासाठी पोषक मानल्या गेलेल्या पदार्थांनी बटाट्यापेक्षा सहापट जास्त तेल शोषून घेतल्याचे आढळले. बटाट्यांमध्ये स्टार्च असल्यामुळे तो तेल कमी शोषून घेतो. त्यामुळे काळजीपूर्वक तळल्यास बटाटे आरोग्यासाठी उत्तम सिद्ध होऊ शकतात, असे डॅडीओ यांनी सांगितले.
जिउसेप्पे डॅडिओ यांच्या मते हा पदार्थ आरोग्यास अजीबात घातक नाही. तळताना अनेक पदार्थ तेल शोषून घेतात. जास्त तेल शोषणारे पदार्थ घातक असल्याचे मनाले जाते. त्यात बटाट्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. परंतु, योग्यप्रकारे तळल्यास बटाट्याचे पदार्थ घातक ठरत नाहीत, असे डॅडीओ यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा