High Blood Pressure: लघवीच्या रंगातील बदल हे शरीरातील बिघाड दर्शवतात. अनेक आजारांचे निदान करण्यासाठी युरीन टेस्ट घेतली जाते. साधारणतः लघवीच्या रंगावरून किडनी संबंधित आजार ओळखले जातात. मात्र केवळ रंगच नाही तर किती वेळा तुम्हाला वॉशरूमला जावं लागतंय यावरूनही तुमच्या स्वास्थ्याचा अंदाज घेता येतो. अनेकांनी रात्रीच्या वेळी किमान ३ ते ४ वेळा लघवीला जावे लागते, सध्या थंडी असल्याने किंवा अधून मधून पाऊस पडून गेल्यावर वातावरणातील गारव्याने वॉशरूमला जावं लागतंय असं अनेकांना वाटू शकतं. पण जर तुम्ही वेळीच लक्ष दिले नाही तर हे एका गंभीर आजाराचे लक्षण ठरू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तज्ज्ञांच्या माहितीनुसार १- २ तासाच्या अंतराने जर आपल्याला लघवीला जावेसे वाटत असेल तर ते साधारण आहे. काही वेळा झोपण्याआधी पाणी प्यायल्याने असे होऊ शकते. मात्र जर तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागत असेल किंवा जावेसे वाटते पण मुळात वॉशरूमला गेल्यावर लघवी होतच नाही असा त्रास जाणवत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे. सतत वॉशरूमला जावे लागणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. रक्तदाब, मधुमेह व हृदयाच्या संबंधित समस्यांचे संकेत आपले शरीर आपल्याला देत असते.

Dengue Symptoms: सलमान खानला डेंग्यूची लागण; चुकूनही घेऊ नका ‘अशी’ औषधं, ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींना रात्री २ वाजल्यानंतर लघवीला जाण्याची अधिक इच्छा होते त्यांना उच्च रक्तदाबाचे त्रास होण्याची ४०% अधिक शक्यता असते. उच्च रक्तदाबाचे हे एकमेव लक्षण नसले तरी अनेक लक्षणांपैकी एक नक्कीच आहे व त्यामुळेच वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. दुर्लक्ष केल्यास ही समस्या हृदयासंबंधित आजारांचा धोकाही निर्माण करते. अनेक जण लघवी संबंधित आजारांना केवळ किडनीतील बिघाड समजतात, पण अशा समस्या वारंवार जाणवत असतील तर तुम्हाला रक्तदाबही तपासून घेणे गरजेचे आहे.

मधुमेहाचाही धोका

डॉक्टरांच्या माहितीनुसार जेव्हा किडनीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते तेव्हा वारंवार लघवीला जाण्याचे प्रमाण वाढते. ग्लुकोजचे वाढलेले प्रमाण हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. यामुळेच रक्तदाबासह रक्तातील साखरेचे प्रमाणही तपासून घेणे हिताचे ठरेल.

(टीप – वरील लेख हा माहितीपर असून, अशा समस्या होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे उचित ठरेल)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Frequent urination at night can cause high blood pressure and diabetes early symptoms in urine infection svs