शरीर लघवीद्वारे टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकते. माणसाच्या लघवीमध्ये पाणी, युरिक ऍसिड, युरिया यांसह अनेक विषारी घटक असतात. अनेक लोक दिवसातून ६-७ वेळा लघवी करतात. तर काही लोकांना सतत लघवीला येते, काही लोक वारंवार लघवीला येणं आरोग्यासाठी चांगले असल्याचं म्हणतात, पण ते अर्धसत्य आहे. कारण एखाद्याला वारंवार लघवी होत असेल तर त्याला काही गंभीर आजारांचा धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सतत लघवी कोणत्या लोकांना करावी लागते आणि त्याचा आरोग्याला धोका काय असू शकतो. याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बीएलके-मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील युरोलॉजी आणि यूरो ऑन्कोलॉजीचे सहयोगी संचालक डॉ. यजवेंद्र प्रताप सिंग राणा यांनी आजतकशी बोलताना वारंवार लघवी करणे योग्य आहे की अयोग्य याबाबतची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, ‘जर एखाद्या व्यक्तीने दिवसातून ३ ते साडेतीन लिटर पाणी प्यायलं आणि तो दिवसभरात दर चार तासांनी लघवीला जात असेल, तर ते योग्य आहे. मात्र, एखादी व्यक्ती सतत लघवी करत असेल तर ते काही आजारांचे लक्षण ठरु शकते.
हेही वाचा- किसिंग डिसीज म्हणजे काय? घसादुखी ते थकवा ‘ही’ पहिल्या टप्प्यातील ८ लक्षणे वेळीच ओळखा अन्यथा…
जर एखाद्या व्यक्तीच्या लघवीचे प्रमाण कमी असेल (१००-३००मिली) पण तो वारंवार लघवीला जात असेल, तर त्याचे कारण अॅक्टीव्ह ब्लेडर असू शकते. दुसरीकडे, जर एखाद्याच्या लघवीचे प्रमाण जास्त (४००-५००मिली) असेल आणि तो दर १-२ 2 तासांनी लघवीला जात असेल, तर त्याला पॉलीयुरिया नावाचा आजार होऊ शकतो.
वारंवार लघवी होण्याचे कारण?
वारंवार लघवी होण्याचला अनेक कारणे जबाबदार ठरु शकतात, जी वय, लिंग किंवा दोन्हीवर आधारित असतात. वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्येकाला वारंवार लघवीची समस्या असू शकते.
ओवरअॅक्टिव ब्लैडर –
अतिक्रियाशील मूत्राशयाला ओएबी (OAB)असंही म्हणतात. यामुळे लघवीची वारंवार आणि अचानक इच्छा होते जी नियंत्रित करणे खूप कठीण होऊ शकते. शिवाय तुम्हाला दिवसभरात सतत लघवी करावीशी वाटते. ओव्हरएक्टिव्ह ब्लॅडरच्या समस्येवर जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून मात करता येऊ शकते. पण काहीही करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
मूत्रमार्ग (यूरिनरी ट्रैक) आणि मूत्राशयाची स्थिती –
यूरिनरी ट्रैक आणि मूत्राशयाची स्थिती हे देखील वारंवार लघवी होण्याचे एक कारण असू शकतात. मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय) हे वारंवार लघवी होण्याचे सामान्य कारण आहे. यूटीआयमुळे बाह्य संसर्ग शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे मूत्र प्रणालीमध्ये जळजळ सुरु होते. ही प्रणाली मूत्रपिंड, मूत्राशय, आणि मूत्र शरीराच्या बाहेर वाहून नेणाऱ्या नळ्या, मूत्रपिंडांना जोडणाऱ्या नळ्यांपासून बनलेली असते. इंटरस्टिशियल सिस्टिटिस आणि ओव्हरएक्टिव्ह सिंड्रोममुळे देखील वारंवार लघवी होऊ शकते. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, वारंवार लघवी होणे हे मूत्राशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
मधुमेह –
वारंवार लघवी होणे हे मधुमेहाचे एक सामान्य लक्षण आहे. जर तुम्हाला टाइप 1 किंवा टाइप 2 मधुमेह असेल तर तुम्हाला तो त्रास उद्भवू शकतो. वास्तविक, मधुमेहामध्ये, तुमची किडनी रक्त फिल्टर करण्यासाठी जास्त काम करते. यामुळे तुम्हाला जास्त द्रव सोडावे लागते. तुम्ही जेवढी जास्त लघवी कराल तितके जास्त द्रव तुमच्या शरीरातून बाहेर पडते.
गर्भधारणा –
गर्भधारणेदरम्यान, गर्भ शरीरात अधिकाधिक जागा व्यापतो, ज्यामुळे मूत्राशय लहान होते. त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. गरोदरपणात हे एक अतिशय सामान्य लक्षण आहे. लघवीच्या समस्येपासून सूटका करण्यासाठी महिलांनी केगल व्यायाम करणं आवश्यक आहे.
प्रोस्टेट (Prostate) –
पुरुषांमध्ये, प्रोस्टेट ही गोल्फ-बॉल-आकाराची ग्रंथी असते जी इजेक्युलेशन दरम्यान सोडले जाणारे काही द्रव बनवते. तुम्ही जसजसे मोठे होता तसे प्रोस्टेटचीही वाढ होते, परंतु जर ते खूप मोठे झाले तर त्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. कारण, वाढलेली प्रोस्टेट तुमच्या मूत्र प्रणालीवर दबाव आणू शकते, ज्यामुळे वारंवार लघवी होते.
वारंवार लघवी होण्याची इतर कारणे –
- पेल्विक ट्यूमर
- स्ट्रोक
- मूत्रवर्धक औषधांचा वापर
- पेल्विक क्षेत्रासाठी रेडिएशन थेरपी
- दारूचे जास्त सेवन
- कॅफिनचे जास्त सेवन
लघवी किती सुरक्षित आहे?
डॉक्टरांच्या मतानुसार, ‘स्वस्थ स्त्री-पुरुषांमध्ये लघवीचा परिणाम दररोज २ ते २.२ लिटर असावे. परंतु, वारंवार लघवी होणे हे काही रोगांचे लक्षण असू शकते. जे मूत्रपिंड, मूत्राशय संसर्ग, मधुमेह, यूटीआय किंवा प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित असू शकतात.
दररोज किती पाणी प्यावे –
एखाद्या व्यक्तीने दिवसभरात ३ लिटर आणि उन्हाळ्यात ३.५० लिटर पाणी प्यायले तर ते सुरक्षित मानले जाते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)