भारतात पोठी आणि भात हा लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. भारतीयांच्या आहारात या दोन गोष्टी नक्कीच आपल्याला पाहायाला मिळतील. जर आपण पोळीबद्दल बोलायचं ठरवलं तर जवळपास गव्हाच्या पिठाची पोळी सगळ्यांच्या घरात होते. लोकांना गरम गरम पोळी खायला आवडते. बऱ्याच वेळा जास्त पीठ मळल्याने लोक तेव्हाच सगळ्या पोळ्या करून घेतात. पोळ्या थंड्या झाल्या की आपण त्याला शिळी पोळी बोलतो. तर अनेक घरांमध्ये ही पोळी प्राण्यांना दिली जाते. मात्र, आजपासून तुम्ही शिळी पोळी टाकूण देणे टाळाल. आजा आम्ही तुम्हाला गरम गरम पोळी आणि शिळ्या पोळीमध्ये काय फरक आहे ते सांगणार आहोत.

एक्सपर्टनुसार, शिळी पोळी फेकणे ही सगळ्यात मोठी चूक आहे. गरम गरम पोळी खाल्याने आपल्याला जेवढे फायदे होतात. त्याहुन जास्त फायदे शिळी पोळी खाल्याने होतात. त्यामुळेच आज पर्यंत जर तुम्ही शिळी पोळी प्राण्यांना देतात तर या पुढे तसं करू नका.

kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?

आणखी वाचा : पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा, पोळी फुलल्याशिवाय राहणार नाही

शिळी पोळी बीपीच्या रुग्णांसाठी खूप फायदेकार आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात अनेकांना बीपीचा त्रास होतो. लोक बऱ्याच प्रकारची औषध घेऊन बीपी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे शिळी पोळी.

दररोज सकाळी दोन शिळ्या पोळी दुधासोबत खाल्ल्या तर रक्तदाब नियंत्रित होतो. हा छोटासा उपाय बीपीच्या समस्येपासून त्वरित आराम मिळतो.

तुम्हाला बीपीचा त्रास नसेल तरी, तुम्ही शिळी पोळी खाल्ली तर हा तुमच्यासाठी वरदानच ठरणार आहे. त्यामुळे आपले अनेक आजारांपासून रक्षण होते. अॅसिडीटीची समस्या असल्यास शिळी पोळी खा. सकाळी शिळी पोळी दुधासोबत खाल्याने अॅसिडीटी देखील होत नाही.

आणखी वाचा : किसून की ठेचून? आल्याचा कडक चहा बनवण्याची योग्य पद्धत

शिळी पोळी खाल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील तर शिळी पोळी खा. पोळीत मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोटा संबंधित प्रत्येक समस्या दूर होतात.

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात तर शिळी पोळी तुमच्यासाठी एक वरदान आहे. बरेच फिटनेस तज्ञ आणि जिम सेंटर त्यांच्या क्लाएंट्सला शिळी पोळी खाण्याचा सल्ला देतात. त्यांचा असा विश्वास आहे की थंड असलेली शिळी पोळी खाल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही.

आणखी वाचा : दिवसा की रात्री? आयुर्वेदानुसार डाळीचे सेवन कधी करावे? जाणून घ्या चांगल्या आरोग्यासाठी आहाराची योग्य वेळ

खरतरं, जेव्हा पोळी बनवली जाते तेव्हा ती मऊ असते. त्यामुळे तिला चावायला जास्त प्रेशर नाही लागत आणि आपण जास्त पोळी खातो. तर दुसरीकडे शिळी पोळी खाताना आपल्याला जास्त वेळ जास्त प्रेशर द्यावा लागतो. त्यामुळे आपण कमी खातो.

गरम गरम पोळीच्या तुलनेत शिळी पोळी जास्त पौष्टिक आहे. बराच वेळ ही चपाती ठेवल्याने त्यात काही असे बॅक्टेरिया तयार होतात जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. त्यामुळेच त्यांना टाकून देण्या पेक्षा त्याचे सेवन करा.