Friendship Day 2023 : मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर नातं आहे. मैत्री बालपणीची असो की म्हातारपणाची, ती नेहमीच खास असते. खरं तर चांगला मित्र किंवा मैत्रीण भेटणे, हा नशीबाचा भाग आहे. याच मैत्रीविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी भारतासह जगभरात फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डे हा मैत्री साजरी करण्याचा दिवस आहे. या दिवशी अनेकजण आपल्या मित्र-मैत्रीनी एकेमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही काही हटके मैत्रींवर आधारीत चारोळ्या पाठवून सुद्धा मित्रांना शुभेच्छा देऊ शकता..

sun shani and shukra grah yuti
पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी मिळणार; ३० वर्षानंतर सूर्य, शनी आणि शुक्र निर्माण करणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Indian Army Day 2025 Wishes in Marathi| Happy Indian Army Day 2025
Indian Army Day 2025 Wishes : लष्कर दिनाच्या द्या भारतीय जवानांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
aquarius Yearly Horoscope 2025 in Marathi | kumbha Rashibhavihsya 2025 in Marathi
Aquarius Yearly Horoscope 2025 : कुंभ राशीला नोकरी, व्यवसायात कधी होणार लाभ? आरोग्य ते नातेसंबंध… कसे असेल वर्ष; वाचा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे भविष्य
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी

हेही वाचा :पालकांनो ही कामे करा, तुमची मुलं कधीच राहणार नाही दु:खी; स्वत:हून तुम्हाला सांगणार त्यांच्या मनातील गोष्टी

१. मैत्री म्हणजे आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
मैत्री म्हणजे जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
मैत्री म्हणजे दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच जी सर्व काही समजते, ती म्हणजे मैञी असते.

२. सुर्यासारखे तेज असावे
चांदण्यासारखी शीतलता असावी
समुद्रासारखी प्रखरता असावी
आणि तुझ्यासारखी मैत्री असावी

३. निळ्याभोर गगनाचा अंत कधी होत नाही
अन् तुझ्या माझ्या मैत्रीचा उल्लेख शब्दात करता येत नाही

४. मित्र असावा तर एक श्रीकृष्ण सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

५. जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री…

हेही वाचा : Friendship Day 2023 : या वर्षी केव्हा आहे ‘फ्रेंडशिप डे’? जाणून घ्या इतिहास अन् बरंच काही ….

६. मोहाच्या निसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जेव्हा कोणी नसतं बरोबर
तेव्हा साथ देते ती मैत्री…

७. मैत्री असावी अशी की
भरकटलेल्या घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
कटू प्रसंगी प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात दिलासा देणारी,
न सांगता काही समजून घेणारी…

८. कागदाची नाव होती,
खेळण्याची मस्ती होती
बालपणीचे दिवस ते..
फक्त मित्रांची दुनियादारी होती..

९. समुद्राचे पाणी कधी आटणार नाही,
आपल्या आठवणी कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
आपली मैत्री कधीच तुटणार नाही..

१०. आयुष्य नावाची स्क्रिन जेव्हा लो बॅटरी दाखवते
आणि तेव्हा कोणताच चार्जर मिळत नाही, तेव्हां पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात
ते म्हणजे, मित्र!!

Story img Loader