Friendship Day 2024 : मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर नातं आहे. आयुष्यात कधीही कोणती समस्या आली तरी हक्काचा मित्र किंवा मैत्रीण कायम आपल्याबरोबर असते. हल्ली नोकरी आणि शिक्षणासाठी आपण घराबाहेर पडतो, गाव शहर सोडतो त्यामुळे अनेकदा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींपासून आपण दूर जातो पण असं म्हणतात खरी मैत्री ही कधीही तुटत नाही. दूर राहूनही मैत्री निभावता येते. जरी अशी मैत्री निभावणे, हे आव्हान वाटत असले तरी याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे मैत्रीचे नाते आणखी घट्ट होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दूर राहूनही मैत्री कशी निभावायची? मैत्रीचे नाते कसे घट्ट करायचे?
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा केला जातो. याच मैत्री दिना निमित्त आज आम्ही तुम्हाला पाच टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या दूर राहणाऱ्या मित्र मैत्रिणींबरोबरचे नाते घट्ट करू शकता आणि यंदाचा फ्रेंडशिप डे त्यांच्याबरोबर साजरा करू शकता. जाणून घेऊ या त्या पाच गोष्टी कोणत्या?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा