Friendship Day Special Gift Idea : मैत्री हे असे नातं आहे जे आपण स्वत: निवडतो. प्रत्येकाकडे एकतरी असा मित्र किंवा मैत्रिण असावी जो तुमच्या चांगल्या वाईट काळात कायम बरोबर असेल. एक असा मित्र किंवा मैत्रिण असावी ज्यांच्याबरोबर तुम्ही तुमच्या मनातील सर्व काही सांगू शकता कारण तो तुम्हाला काय वाटतं हे ऐकून घेईल, तुम्हाला समजून घेईल. तुम्हाला दुख झालं तर धीर देईल, तुम्ही चुक केली तर तुम्हाला ओरडेल, पण तितक्याच प्रेमाने पुन्हा काळजी घेईल. रोज भेटला नाही, चे कितीही दूर असला तरी कायम तुमच्याबरोबर असेल. तुमच्याकडे असा मित्र किंवा मैत्रिण आहे का? असेल तुमच्यासारखे भाग्यावान कोणीही नाही. पण तुमच्या या खास मित्राला किंवा मैत्रिणीला तुम्ही कधी थँक्यू बोलला आहात का? नसेल तर या ४ ऑगस्टला तुम्ही त्यांचे आभार व्यक्त करू शकता. या वर्षी, फ्रेंडशिप डे रविवारी, ४ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या सुंदर दिवशी तुमच्या मित्रांना मनापासून तुम्ही तयार केलेली भेट देऊन आश्चर्यचकित करा आणि त्यांच्याबद्दल तुमचे प्रेम व्यक्त करा. फ्रेंडशिप डे निमित्त खास भेटवस्तू कशा तया करू शकता हे जाणून घ्या

मैत्री दिवस DIY भेट कल्पना स्क्रॅपबुक (Friendship Day DIY Gift Ideas )

थॉट बबल विथ फोटो कोलाज (Picture Collage With Thought Bubbles )

तुमच्या मित्रांसाठी सर्वाोतम भेटवस्तूंपैकी एक म्हणजे ‘थॉट बबल विथ फोटो कोलाज;. कार्डबोर्डचा एक मोठा तुकडा घ्या आणि तुमच्या सर्व आवडत्या आठवणींचे फोटो घ्या फोटो पेपरवर फोटो प्रिंट करून घ्या, त्यांना कार्डबोर्डवर तुम्हाला हवे तसे चिकटवा. तुमच्या मित्रासाठी खास संदेश लिहण्यासाठी लहान बबल-आकाराचे कट-आउट पेस्ट करून चिटकवा. तुमच्या मित्रासाठी खास संदेश त्यावर लिहा. तुमच्या मित्राला हे गिफ्ट नक्की आवडेल.

4 ways to clean white shoes how to clean white shoes without washing
मळलेले शूज धुतल्यानंतर पावसाळ्यात लवकर सुकत नाहीयेत? मग पाण्याशिवाय ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने करा स्वच्छ
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
do you have bad body posture due to 8 to 9 hours sitting job
VIDEO : ८-९ तास एकाच जागी बसून काम असल्याने शरीराचे पोश्चर बिघडले? टेन्शन घेऊ नका, फक्त ५ मिनिटे ही योगासने करा
how to reuse old non stick pan and tawa
कोटिंग खराब होताच नॉन स्टीक पॅन फेकून देताय? मग जरा थांबा, त्याचा ‘असा’ करा पुन्हा वापर
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
sharad pawar on modi eknath shinde
Sharad Pawar Speech Today: “अटल बिहारी वाजपेयींच्या काळात मी विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा…”, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ प्रसंग; मोदींवर टीकास्र!
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

मिक्स चॉकलेट बॉक्स (Assorted Chocolate Box)

जर तुमचा मित्र चॉकलेट प्रेमी असेल तर त्यांना या फ्रेंडशिप डेला विविध प्रकारचे चॉकलेट बॉक्स किंवा जार भेट द्या. बाजारातून एखादे विकत घेण्याऐवजी घरच्या घरी चॉकलेट आणून छानपैकी सजवा. तुमच्या मित्राची आवडते चॉकलेट्स विकत घ्या आणि एका फॅन्सी सजवलेल्या बॉक्समध्ये किंवा जारमध्ये ठेवा. त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी हाताने तयार केलेले कार्ड किंवा हस्तलिखित संदेश त्याबरोबर जोडा. तुमचा मैत्रिणीला हे गिफ्ट पाहून खूप आनंद होईल.

वॉल आर्ट (Wall Art)

तुम्हाला जर ब्रश आणि रंगांद्वारे उत्तम प्रकारे कलाकृती साकराता येत असेल तर तुमच्या जिवलग मैत्रिणीला मित्रासाठी वॉल आर्ट बनवा जे ते त्यांच्या खोलीत लावू शकतील आणि तुमची आठवण म्हणून ते जपून ठेवतील. तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला ही ही भेट कायम लक्षात राहील.

होममेड कुकीज किंवा मिष्टान्न (Home made Cookies and Sweet)

तुमच्या जिवलग मित्र किंवा मैत्रिणीसाठी तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्यांचासाठी तुमच्या हाताने काहीतर स्वादिष्ट अन्न तयार करा. तुम्ही त्यांच्या काही आवडत्या कुकीज बेक करू शकता किंवा त्यांना आवडेल अशी मिष्टान्न बनवू शकता. त्याचे मूल्य वाढविण्यासाठी सुंदर बॉक्समध्ये पॅक करा आणि त्याबरोबर स्वत:च्या हाताने लिहिलेला संदेश जोडा.

स्क्रॅपबुक (Scrap Book)

जर तुम्ही आणि तुमचा मित्र लहानपणापासून मित्र असाल, तर तुमच्या मैत्रीचा आदर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मैत्रीची टाइमलाइन स्क्रॅपबुक बनवणे. तुमची फोटो आणि सुंदर आठवणी एकत्र गोळा करा आणि तुम्हाला एकमेकांबद्दल कसे वाटते याबद्दल मनापासून लिहा त्या स्क्रॅपबुकमध्ये पेस्ट करा.