Friendship Day Special Gift Idea : मैत्री हे असे नातं आहे जे आपण स्वत: निवडतो. प्रत्येकाकडे एकतरी असा मित्र किंवा मैत्रिण असावी जो तुमच्या चांगल्या वाईट काळात कायम बरोबर असेल. एक असा मित्र किंवा मैत्रिण असावी ज्यांच्याबरोबर तुम्ही तुमच्या मनातील सर्व काही सांगू शकता कारण तो तुम्हाला काय वाटतं हे ऐकून घेईल, तुम्हाला समजून घेईल. तुम्हाला दुख झालं तर धीर देईल, तुम्ही चुक केली तर तुम्हाला ओरडेल, पण तितक्याच प्रेमाने पुन्हा काळजी घेईल. रोज भेटला नाही, चे कितीही दूर असला तरी कायम तुमच्याबरोबर असेल. तुमच्याकडे असा मित्र किंवा मैत्रिण आहे का? असेल तुमच्यासारखे भाग्यावान कोणीही नाही. पण तुमच्या या खास मित्राला किंवा मैत्रिणीला तुम्ही कधी थँक्यू बोलला आहात का? नसेल तर या ४ ऑगस्टला तुम्ही त्यांचे आभार व्यक्त करू शकता. या वर्षी, फ्रेंडशिप डे रविवारी, ४ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या सुंदर दिवशी तुमच्या मित्रांना मनापासून तुम्ही तयार केलेली भेट देऊन आश्चर्यचकित करा आणि त्यांच्याबद्दल तुमचे प्रेम व्यक्त करा. फ्रेंडशिप डे निमित्त खास भेटवस्तू कशा तया करू शकता हे जाणून घ्या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा