दूध शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. दूध हे गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण पितात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, अंबानी ते अमिताभ बच्चन यांच्या घरी कोणत्या डेअरीचे दूध येते आणि त्याची किंमत किती आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील पुणे शहरात एक आधुनिक आणि हायटेक डेअरी आहे, तिचे नाव आहे ‘भाग्यलक्ष्मी डेअरी’. मुंबईशिवाय देशातील अनेक मोठ्या व्यक्तींच्या घरी या डेअरीचे दूध पुरवले जाते. भाग्यलक्ष्मी डेअरीच्या ग्राहक यादीत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. भातातील आघाडीचे उद्योजक अंबानी कुटुंबापासून ते क्रिकेटर सचिन तेंडुलकर, महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि हृतिक रोशनसारख्या सेलिब्रिटींच्या घरापर्यंत या डेअरीचे दूध पोहचते.

१३ वर्षीय भारतीय हरिनी लोगनची कमाल! जिंकला ‘National Spelling Bee 2022’ चा ऐतिहासिक टायब्रेकर

देवेंद्र शहा हे या डेअरी फार्मचे मालक आहेत. पूर्वी ते कपड्यांचा व्यवसाय करायचे, पण नंतर शहा यांनी १७५ ग्राहकांसह ‘प्राइड ऑफ काऊ’ लाँच केले. आता त्यांच्याकडे २५ हजारांहून अधिक ग्राहक आहेत. देशभरात त्यांचे ग्राहक असून देशातल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये या दुधाचा पुरवठा केला जातो.

डेअरीत होल्स्टेन फ्रिशियन प्रजातीच्या ३ हजारांहून अधिक गायी आहेत. ही जात स्वित्झर्लंडची आहे. या प्रजातीची गाय दररोज २५-२८ लिटर दूध देते. या गायींची किंमत ९० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत आहे. येथे गायींची सर्वप्रकारे काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी ठेवलेल्या रबर मॅट्स देखील दिवसातून ३ वेळा स्वच्छ केल्या जातात. या गायी फक्त आरओचे पाणी पितात. गायीला सोयाबीनशिवाय अल्फा गवत, हंगामी भाज्या आणि मक्याचा चारा दिला जातो.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

गाईचे दूध काढण्यापासून ते बाटलीत भरण्यापर्यंत सर्व काही स्वयंचलित आहे. फार्मवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम पाय स्वच्छ करणे आवश्यक आहे. दूध काढण्यापूर्वी प्रत्येक गायीचे वजन आणि तिचे तापमान मोजले जाते. एखादी गाय आजारी असल्याचे आढळून आल्यास तिला तातडीने रुग्णालयात नेले जाते. दूध सायलोमध्ये पाईप केले जाते आणि नंतर पाश्चरायझेशन केले जाते आणि बाटल्यांमध्ये पॅक केले जाते.

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मंचरजवळ भाग्यलक्ष्मी डेअरी आहे. या डेअरीत एक लिटर दुधाची किंमत सुमारे १५२ रुपये आहे. ही डेअरी ३५ एकर परिसरात पसरलेली आहे, जिथे ३००० पेक्षा जास्त गायी आहेत. या डेअरीत दररोज २५ हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. येथे आधुनिक व स्वच्छ दुग्ध उत्पादन प्रणाली अंतर्गत दूध काढले जाते. येथील दूध उच्च दर्जाचे असल्याची पूर्ण हमी देण्यात येते.

देवेंद्र शहा यांची मुलगी आणि कंपनीचे मार्केटिंग प्रमुख अक्षली शहा यांच्या म्हणण्यानुसार, फ्रीजिंग व्हॅनमधून दररोज पुण्याहून मुंबईला दूध पुरवठा केला जातो. पुण्याहून मुंबईला हे दूध पोहोचवायला साडेतीन तास लागतात.