सुकामेव्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बदाम. कोणताही गोडाचा पदार्थ केला की त्यावर बदाम हे हवेच. चवीला उत्तम असणाऱ्या बदामाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. परंतु, बदाम केवळ स्मरणशक्ती वाढविण्यासाठीच वापरले जातात असा अनेकांचा समज आहे. मात्र बदाम खाण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत.
बदामात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. यामध्ये केवळ पोषणमूल्ये आणि जीवनसत्त्वेच नसतात तर त्यामुळे पदार्थाला स्वाद येतो. गोड पदार्थांमध्ये बदाम खूपच छान लागतात. बदामाला सुक्या मेव्याचा राजा म्हणूनही ओळखले जाते. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, बदामात असतात. स्मृतिभ्रंश, विस्मरण या आजारांसाठी बदाम उपयुक्त आहे. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषध व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास बदामाची मदत होते.
बदाम खाण्याचे फायदे
- हृदयासंबंधीत समस्या दूर होण्यास मदत मिळते.
- रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
- वजन कमी होतं.
- डोळ्यासंबंधीत तक्रारी दूर होतात.
- पचनक्रियेचं कार्य सुरळीत होते.
- अपचन, गॅसेस समस्या दूर होतात.
- कानदुखत असल्यास बदामाच्या तेलाचे १-२ थेंब टाकावेत. कानदुखी थांबते.
- शांत झोप लागते.
- त्वचा उजळते.
- डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.
- त्वचेसंबंधीत समस्या दूर होतात.
- केसांची वाढ होते.
आहारातील चवळीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजारांवर आहे प्रभावी
बदामाच्या तेलाचा वापर कसा करावा?
१. अंगदुखत असल्यास बदामाच्या तेलाने हातापायांची मालिश करावी.
२. चेहऱ्याचा पोत, रंग सुधरण्यासाठी बदामाचं तेलाचा लेप तयार करावा. यासाठी १ मोठा चमचा बदाम तेल घेऊन त्यात १ चमचा गुलाबपाणी मिक्स करावं. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावावा आणि १५ मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
३. बदामाचं सेवन करायचं असल्यास एक कप दुधात २-३ चमचे बदाम तेल टाकावं.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)