हिवाळ्यात आपण सर्वांनी हंगामी पदार्थांसह अशा काही पदार्थांचे सेवन केले पाहिजे जे शरीर उबदार, निरोगी आणि मौसमी आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात. असे अनेक पदार्थ आहेत जे त्यांच्या पौष्टिकतेसाठी ओळखले जातात. त्यापैकी आले एक गुणकारी पदार्थ आहे. हिवाळ्यात तुमच्या आहारात आले समाविष्ट करण्याची शिफारस तज्ञ नेहमी करतात. तसेच आल्याला “हिवाळ्यातील सुपरफूड” म्हणतात.

पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी असे सांगितले आहे की, “आले भारतीय स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या सर्वात महत्त्वाच्या मसाल्यांपैकी एक आहे, ते तिखट आणि सुगंधी आहे. हे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. सध्या थंडीचा हंगाम सुरू आहे. आपल्याला उबदार आणि निरोगी आहाराची आवश्यकता आहे. याकरिता तुमच्या आहारात आल्याचा समावेश करा. चला तर मग जाणून घेऊयात हिवाळ्याच्या दिवसात आहारात आल्याचे समावेश केल्याने तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात.

पचनास मदत करते

आल्याचे आहारात समावेश केल्यास अन्न पचन करण्यास मदत करते. त्याचबरोबर गॅस तयार होण्यास देखील प्रतिबंध करते. मळमळ आणि उलट्या कमी करण्याच्या क्षमतेव्यतिरिक्त संपूर्ण पचन सुधारण्यासाठी अदरक खूप गुणकारी आहे.

सर्दी, खोकला आणि फ्लूकरिता प्रभावी

आल्याचे औषधी गुणधर्म जळजळ आणि घसा खवखवणे या समस्येपासून आराम मिळतो. तसेच हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे आणि हिवाळ्यात होणाऱ्या विषाणूंपासून आपले संरक्षण करण्यास देखील मदत करतात.

Beauty Care Tips : कच्च्या दुधाने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतात का? जाणून घ्या

सांधेदुखीपासून मुक्तता

आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात. यामुळे तुमची संपूर्ण प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच आल्याचे दाहक-विरोधी गुणधर्म विशेषतः संधिवात असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत.

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

आले एक एन्झाइम सक्रिय करते, जे शरीरातील कोलेस्टेरॉलचा उपयोग वाढवतात आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.

आहारात आले अशा पद्धतीने करा समाविष्ट

तुमच्या आहारात आल्याचा समावेश करा.

पाण्यात आले उकळून त्या पाण्याचे सकाळी आणि संध्याकाळी नियमित सेवन करा.

५-१० मिली आल्याचा रस आवळ्याच्या रसात मिसळून दररोज सकाळी सेवन करा.

Story img Loader